कोरोना प्रतिबंधक लसीकरणात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:09 IST2021-02-07T04:09:25+5:302021-02-07T04:09:25+5:30
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असली तरी नागपूर जिल्ह्यात लसीकरणाच्या टक्केवारीत शनिवारी घट झाल्याचे दिसून ...

कोरोना प्रतिबंधक लसीकरणात घट
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असली तरी नागपूर जिल्ह्यात लसीकरणाच्या टक्केवारीत शनिवारी घट झाल्याचे दिसून आले. २२०० पैकी १००० लाभार्थ्यांनीच लस घेतल्याने ४५ टक्केच लसीकरण झाले. विशेष म्हणजे, पोलीस हॉस्पिटलच्या केंद्रावर १०० लाभार्थ्यांचे लक्ष्य देण्यात आले असताना त्यापैकी ५५ लाभार्थ्यांनी लस घेतली. यात १७ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता.
नागपूर ग्रामीणमध्ये तीन केंद्रांवर लसीकरण झाले. प्रत्येक केंद्राला १०० नुसार ३०० लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी १६६ लाभार्थ्यांनी लस घेतली. याचे प्रमाण ३५.३३ टक्के आहे. शहरात १९ केंद्रांनाही प्रत्येकी १०० नुसार १९०० लाभार्थ्यांना लस देण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ८३४ लसीकरण झाले. याचे प्रमाण ४३.८९ टक्के आहे. यात मेयोमध्ये २० टक्के, एम्समध्ये १५ टक्के, डागामध्ये १६ टक्के, पाचपावली ‘अ’ केंद्रावर ९० टक्के, ‘ब’ केंद्रावर २२ टक्के, आयसोलेशन हॉस्पिटलच्या केंद्रावर ६० टक्के, मेडिकलच्या ‘अ’ केंद्रावर ४० टक्के, ‘ब’ केंद्रावर ५५ टक्के, ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या केंद्रावर ७० टक्के, सिम्स हॉस्पिटलच्या केंद्रावर ३४ टक्के, दंदे हॉस्पिटलच्या केंद्रावर ६४ टक्के, वोक्हार्ट हॉस्पिटलच्या केंद्रावर ४७ टक्के, विमा हॉस्पिटलच्या केंद्रावर ३७ टक्के, किंग्जवे हॉस्पिटलच्या केंद्रावर ५२ टक्के, अॅलेक्सीस हॉस्पिटलच्या केंद्रावर ४० टक्के, म्युर मेमोरीअल हॉस्पिटलच्या केंद्रावर ५५ टक्के, आयजीआर केंद्रावर ४८ टक्के तर पोलीस हॉस्पिटलच्या केंद्रावर ५५ टक्के लसीकरण झाले.
- वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली लस
पोलीस हॉस्पिटलमध्ये लसीकरणाची सुरुवात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लस घेऊन केली. या वेळी अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) डॉ. दिलीप झलके, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) डॉ. संदीप पखाले यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक विजयप्रताप परिहार, सार्थक नेहेते, अनिल मेश्राम यांनी लसीकरण केले.