शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरांवरील कारवाईत घट : वर्षभरात लाचप्रकरणांत ११० सापळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 20:45 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयातर्फे २०१७ या एका वर्षात एकूण ११० लाच प्रकरणांत यशस्वी सापळे रचण्यात आले. मागील तीन वर्षांपासून या आकड्यात सातत्याने घट होत आहे. २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये यशस्वी सापळ्यामध्ये १८ टक्क्यांनी घट झाली आहे. एकीकडे भ्रष्टाचार घटला नसल्याची ओरड सामान्य नागरिकांकडून होत असताना, ही आकडेवारी पाहता खरोखरच भ्रष्टाचार कमी झाला की लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईचा उत्साहच जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देभ्रष्टाचार घटला की ‘एसीबी’चा उत्साह थकला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयातर्फे २०१७ या एका वर्षात एकूण ११० लाच प्रकरणांत यशस्वी सापळे रचण्यात आले. मागील तीन वर्षांपासून या आकड्यात सातत्याने घट होत आहे. २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये यशस्वी सापळ्यामध्ये १८ टक्क्यांनी घट झाली आहे. एकीकडे भ्रष्टाचार घटला नसल्याची ओरड सामान्य नागरिकांकडून होत असताना, ही आकडेवारी पाहता खरोखरच भ्रष्टाचार कमी झाला की लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईचा उत्साहच जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१७ या वर्षभरातील लाच प्रकरणे, त्यात अडकलेले अधिकारी-कर्मचारी, झालेली कारवाई इत्यादीसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे माहितीच्या अधिकारात विचारणा केली होती. लाचलुचपत खात्याच्या पोलीस उपअधीक्षकांकडून प्राप्त अधिकृत आकडेवारीनुसार २०१७ मध्ये वर्षात ११० सापळा प्रकरणांमध्ये १४२ आरोपी अडकले.एकूण सापळ्यात अडकलेल्यांमध्ये पोलीस विभागातील ३२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. २०१६ मध्येदेखील पोलीस खात्याचा लाचखोरांमध्ये पहिला क्रमांक होता. महसूल खात्यात १४सापळ्यामध्ये १९ जण लाच घेताना अडकले. वन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात १० सापळे यशस्वी ठरले व यात १२ जण अडकले.‘क्लास वन’चे १३ अधिकारी सापळ्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत एकूण १३ ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याप्रकरणी कारवाई झाली. यात पोलीस विभागातील ४, महसूल विभाग व जिल्हा परिषदेतील प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दुसऱ्या श्रेणीतील १३ अधिकाऱ्यांना लाच प्रकरणात पकडण्यात आले. सर्वात कमी म्हणजे ७ कर्मचारी हे चतुर्थ श्रेणीतील निघाले.६ वर्षांत ६९६ प्रकरणे२०१२ पासून नागपुरात लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे लाचखोरीची ६९६ प्रकरणे समोर आणण्यात आली. २०१२ ते २०१५ मध्ये हे प्रकरणांचे प्रमाण सातत्याने वाढत होते. मात्र त्यानंतर एकूण सापळ्याचे प्रमाण घटलेले आहे.विभागनिहाय कारवाईपोलीस ३२महसूल १९वन १२जिल्हा परिषद ११पंचायत समिती ११ग्रामपंचायत ९आरोग्य ८वर्षनिहाय प्रकरणे२०१२     ५१२०१३    ७२२०१४    १५५२०१५   १७३२०१६   १३५२०१७   ११०श्रेणीनिहाय लाचखोर @ २०१७वर्ग १     १३वर्ग २     १३वर्ग ३    ८८वर्ग ४    २इलोसे    ९खासगी   १७

 

 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागnagpurनागपूर