शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

हायकोर्टाचा निर्णय : ३६ आठवड्यांचा गर्भ पाडण्यास परवानगी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:03 AM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आनुवंशिक विकृती असलेला ३६ आठवड्याचा गर्भ पाडण्याची परवानगी देण्यास नकार दिला. संबंधित बाळाला ‘ट्रिसोमी २१’ ही आनुवंशिक विकृती आहे. त्यामुळे आईने गर्भपाताची परवानगी मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांनी गुरुवारी विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता ती याचिका खारीज केली.

ठळक मुद्देबाळाला आनुवंशिक विकृती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आनुवंशिक विकृती असलेला ३६ आठवड्याचा गर्भ पाडण्याची परवानगी देण्यास नकार दिला. संबंधित बाळाला ‘ट्रिसोमी २१’ ही आनुवंशिक विकृती आहे. त्यामुळे आईने गर्भपाताची परवानगी मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांनी गुरुवारी विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता ती याचिका खारीज केली.याचिकाकर्ती विद्या ही बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून ती पहिल्यांदा गर्भवती राहिली आहे. २७ फेब्रुवारी रोजी तिने पहिली सोनोग्राफी केली असता गर्भ सामान्य होता. परंतु, २१ मार्च रोजी केलेल्या दुसऱ्या सोनोग्राफीमध्ये गर्भातील बाळाला ‘ट्रिसोमी २१’ ही आनुवंशिक विकृती असल्याचे आढळून आले. दरम्यान, विद्याने वैद्यकीय उपचार केले, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यातच गर्भाने २० आठवड्याचा कालावधी ओलांडला व उच्च न्यायालयात याचिका दाखल करतपर्यंत गर्भ ३६ आठवड्याचा झाला. कायद्यानुसार, २० आठवड्यावरील गर्भ पाडता येत नाही. परिणामी, विद्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, तिला दिलासा मिळाला नाही. विद्यातर्फे अ‍ॅड. मंगेश बुटे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयpregnant womanगर्भवती महिला