(निर्णयार्थ) मुख्यमंत्री नागपूर दौऱ्यावर येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:06 IST2020-11-28T04:06:49+5:302020-11-28T04:06:49+5:30
नागपूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरच नागपूर दौऱ्यावर येण्याचा मानस व्यक्त केला आहे. शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत त्यांची ...

(निर्णयार्थ) मुख्यमंत्री नागपूर दौऱ्यावर येणार
नागपूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरच नागपूर दौऱ्यावर येण्याचा मानस व्यक्त केला आहे. शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत त्यांची भेट घेतली. त्यावेळी चर्चेदरम्यान ठाकरे यांनी आपली भावना बोलून दाखविली.
संपर्क प्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या नवनियुक्त कार्यकारिणी सदस्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना शहरात होणाऱ्या कामांची माहिती दिली. नागपुरातदेखील शाखा सुरू करण्यात याव्या व पक्षाला मजबुती देण्यात यावी अशी सूचना केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत, सचिव अनिल देसाई, मंत्री अनिल परब व सुभाष देसाई यांचीदेखील भेट घेतली. महानगर प्रमुख प्रमोद मानमोड़े, शहर प्रमुख नितीन तिवारी व दीपक कापसे, संघटक मंगेश काशीकर, विशाल बरबटे, बंडू तळवेकर, प्रशांत वसाड़े, प्रसाद मानमोड़े, किशोर पराते , गुड्डू रहांगडाले यावेळी उपस्थित होते.