शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर  विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 17:14 IST

नागपूर :  राज्यात भाजपाची सत्ता आल्यास सोलापूर विद्यापीठाचे नामांतर करण्याचे आश्वासन धनगर समाजाला दिले होेते.

नागपूर :  राज्यात भाजपाची सत्ता आल्यास सोलापूर विद्यापीठाचे नामांतर करण्याचे आश्वासन धनगर समाजाला दिले होेते. त्यानुसार राज्य सरकार या विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव  देण्याचा निर्णय घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्यात केली. धनगर आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने स्नेहनगर येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.व्यासपीठावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री महादेव जानकर, धनगर समाज संघर्ष समितीचे संयोजक खासदार विकास महात्मे, आमदार नारायण कुचे, बाळासाहेब मिरकुटे, गणेश हाके, डॉ. राजीव पोतदार, बाबुराव शिंदे यांच्यासह धनगर आरक्षण संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. धनगर समाजात रोष असल्याने धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्याला कशाला जाता असे सल्ले काही लोकांनी दिले. परंतु मी कुणाशी बेईमानी केलेली नाही. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे. कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत याबाबतची शिफारस करू शकलो असतो. ठराव करून केंद्राकडे प्रस्ताव पाठविता आला असता. परंतु संवैधानिक बाबींची पूर्तता करून धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेऊ. आरक्षणाबाबतचा अहवाल टाटा इन्स्टिट्युट आॅफ सायन्स तयार करीत आहे. हा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबरमध्ये तो तयार होईल, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. टाटा इन्स्टिट्युट आॅफ सायन्सने 20हून अधिक जिल्ह्यातील शेकडो गावात जाऊन अभ्यास केला. धनगर समाजाची निवेदने ग्राह्य धरली. पण काही लोक आदिवासींना भडकावण्याचे काम करीत आहे. धनगर समाजाला आरक्षण देताना आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. तसेच धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व वसतिगृहाची सुविधा राज्य सरकारमार्फत उपलब्ध करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

टॅग्स :Solapurसोलापूरuniversityविद्यापीठ