शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सिंचन घोटाळ्यातील आरोपींच्या जामिनावर गुरुवारपर्यंत निर्णय द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 8:09 PM

गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पांतर्गत येणाºया मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याच्या बांधकाम निविदा वाटपात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणातील सहा आरोपींच्या जामीन अर्जांवर येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत निर्णय देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विशेष सत्र न्यायालयाला दिला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश : विशेष सत्र न्यायालयावर नाराजी व्यक्त केली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याच्या बांधकाम निविदा वाटपात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणातील सहा आरोपींच्या जामीन अर्जांवर येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत निर्णय देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विशेष सत्र न्यायालयाला दिला आहे.आरोपींमध्ये कंत्राटदार आर. जे. शाह कंपनी व डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन कंपनीचे भागीदार कालिंदी राजेंद्र शाह, तेजस्विनी राजेंद्र शाह, विशाल प्रवीण ठक्कर, प्रवीण नाथालाल ठक्कर, जीगर प्रवीण ठक्कर व अरुणकुमार गुप्ता यांचा समावेश आहे. त्यांनी गेल्या ९ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले आहेत. परंतु, नियमित न्यायालय वैद्यकीय रजेवर असल्यामुळे अर्जांवरील निर्णय लांबत आहे. त्यामुळे या आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता विशेष सत्र न्यायालयावर नाराजी व्यक्त केली. कोणत्याही कारणांवरून प्रकरणावरील निर्णय लांबणे मान्य केले जाऊ शकत नाही असे न्यायालयाने सांगून हा आदेश दिला. नियमित न्यायाधीश रजेवर असल्यास पर्यायी न्यायालयात अर्जांवर सुनावणी करून निर्णय देण्यात यावा, पण यानंतर सुनावणी तहकूब करू नये असेही उच्च न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या आरोपींसह एकूण १२ आरोपींविरुद्ध ४५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. आरोपींमध्ये गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचे मुख्य अभियंता व पूर्व अर्हता मूल्यांकन समितीचे सदस्य सोपान रामराव सूर्यवंशी, वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी चंदन तुळशीराम जिभकाटे, सेवानिवृत्त कार्यकारी संचालक देवेंद्र परशुराम शिर्के व अधीक्षक अभियंता दिलीप देवराव पोहेकर या शासकीय अधिकाºयांचाही समावेश आहे.असे आहेत दोषारोपआरोपींवर फसवणूक करणे (भादंवि कलम ४२०), फसवणुकीच्या उद्देशाने संगनमत करणे (भादंवि कलम ४६८), बनावट कागदपत्रे खरे भासवून वापरणे (भादंवि कलम ४७१), कट रचणे (भादंवि कलम १२०-ब), सरकारी अधिकाऱ्याने फौजदारी गुन्हा करणे [लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम १३(१)(क)(ड)] हे दोषारोप ठेवण्यात आले आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCorruptionभ्रष्टाचार