शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयाच्या पदांना मंजुरी मागणाऱ्या प्रस्तावावर निर्णय घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 16:55 IST

Nagpur : हायकोर्टाचा आरोग्य विभागाच्या उच्चस्तरीय समितीला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मानकापूर येथील शासकीय मनोरुग्णालयाच्या परिसरात बांधण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयासाठी विविध आवश्यक पदांना मंजुरी मागणाऱ्या प्रस्तावावर येत्या ४ फेब्रुवारीपर्यंत निर्णय घ्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बुधवारी आरोग्य विभागाच्या उच्चस्तरीय समितीला दिला.

हे रुग्णालय तातडीने कार्यान्वित व्हावे, यासाठी सामाजिक कार्यकर्ते सत्यव्रत दत्ता व धरमदास बागडे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी या रुग्णालयासाठी विविध आवश्यक पदांना मंजुरी मिळण्यासाठी मे-२०२३ मध्ये उच्चस्तरीय समितीला प्रस्ताव सादर केला गेला आहे, अशी माहिती दिली. तसेच, या प्रस्तावावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही, याकडे लक्ष वेधले. करिता, न्यायालयाने हा आदेश दिला व पुढच्या तारखेला आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असेही सांगितले. 

१०० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयामध्ये ओपीडी, नेत्ररोग, ईसीजी, प्रयोगशाळा, फिजिओथेरपी, रक्तपेढी, एक्स-रे, स्त्रीरोग, प्रसूती, बालरोग, सोनोग्राफी, शस्त्रक्रिया, अतिदक्षता, दंतचिकित्सा आदी वैद्यकीय सुविधा राहणार आहेत. १७ जानेवारी २०१३ रोजी मंजूर हे रुग्णालय बांधण्यासाठी २ मे २०१८ रोजी एन. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला कार्यादेश दिला गेला होता. त्यानंतर हे काम १ मे २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, प्रशासकीय अडचणी व कोरोनामुळे रुग्णालय बांधण्यास विलंब झाला. दरम्यान, न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आवश्यक आदेशांमुळे रुग्णालयाच्या कामांना गती मिळाली. 

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय