शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांची परीक्षा सुरुवातीला घेण्याच्या मागणीवर निर्णय घ्या

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: April 7, 2025 19:04 IST

Nagpur : हायकोर्टाचा शालेय शिक्षण संचालकांना आदेश

नागपूर : वाढत्या तापमानामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेशी संलग्नित सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता नववी अशा क्रमाने परीक्षा घेण्याच्या मागणीवर तातडीने निर्णय घ्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने सोमवारी परिषदेच्या संचालकांना दिला.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. परिषदेच्या संचालकांनी संलग्नित सर्व शाळांमधील परीक्षांचा कालावधी समान असावा, या उद्देशाने २७ फेब्रुवारी २०२५ रोजी इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार इयत्ता नववी ते इयत्ता पहिली अशा क्रमाने परीक्षा घेतल्या जाणार आहेत. इयत्ता आठवी व नववीसाठी ८ ते २५ एप्रिल, इयत्ता सहावी व सातवीसाठी १९ ते २५ एप्रिल, इयत्ता पाचवीसाठी ९ ते २५ एप्रिल, इयत्ता तिसरी व चौथीसाठी २२ ते २५ एप्रिल तर, इयत्ता पहिली व दुसरीसाठी २३ ते २५ एप्रिलपर्यंत तारखा देण्यात आल्या आहेत. लहान मुलांच्या परीक्षा विलंबाने होणार आहेत. परिणामी, पालक राजेश सुलभेवार व इतरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तापमान सतत वाढत असल्यामुळे लहान मुलांच्या परीक्षा आधी घेणे आवश्यक आहे, असे त्यांचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता हा आदेश देऊन याचिका निकाली काढली.

मनमानी पद्धतीने ठरविला कार्यक्रमउच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशामुळे २००७-०८ ते २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापर्यंत परिषदेशी संलग्नित सर्व शाळा २१ एप्रिल ते ३० जूनपर्यंत बंद ठेवल्या जात होत्या. या वर्षी त्या आदेशाकडे व पालकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून परीक्षांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. कार्यक्रम ठरविताना मनमानी करण्यात आली. डोक्याचा वापर करण्यात आला नाही, असा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला होता. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षणnagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय