मुलीस अनुकंपा नोकरी देण्यावर निर्णय घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2022 21:37 IST2022-08-09T21:37:06+5:302022-08-09T21:37:33+5:30
Nagpur News चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वन विभाग येथील दिवंगत वनपालाच्या मुलीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यावर दोन महिन्यांमध्ये कायद्यानुसार निर्णय घ्या, असा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणच्या नागपूर खंडपीठाने दिला.

मुलीस अनुकंपा नोकरी देण्यावर निर्णय घ्या
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वन विभाग येथील दिवंगत वनपालाच्या मुलीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यावर दोन महिन्यांमध्ये कायद्यानुसार निर्णय घ्या, असा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणच्या नागपूर खंडपीठाने दिला.
ओमशांती चांभारे असे मुलीचे नाव आहे. वनपाल वडिलांचे २५ ऑक्टोबर २०१८ रोजी निधन झाले. त्यांना चार अपत्ये आहेत. एका मुलाचा ३१ डिसेंबर २००१ नंतर जन्म झाला आहे. त्यामुळे ८ मार्च २००१ रोजीच्या शासन निर्णयानुसार ओमशांती यांचा अनुकंपा नोकरीचा अर्ज नामंजूर करण्यात आला होता. त्याविरुद्ध ओमशांती यांनी न्यायाधिकरणात अर्ज दाखल करून उच्च न्यायालयाने ८ मार्च २००१ रोजीच्या शासन निर्णयातील वादग्रस्त तरतूद घटनाबाह्य ठरविल्याची माहिती दिली. परिणामी, न्यायाधिकरणने हा आदेश दिला. ओमशांतीतर्फे ॲड. नरेंद्र ठोंबरे यांनी बाजू मांडली.