‘त्या’ मृताची ओळख पटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:13 IST2021-09-09T04:13:21+5:302021-09-09T04:13:21+5:30
काटाेल : पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गाेन्ही शिवारात मंगळवारी (दि. ७) विहिरीत एका अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, मृताच्या ...

‘त्या’ मृताची ओळख पटली
काटाेल : पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गाेन्ही शिवारात मंगळवारी (दि. ७) विहिरीत एका अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, मृताच्या नातेवाइकांनी केलेल्या ओळख परेडवरून मृताची ओळख पटली.
रमेश अजाबराव बेलेकर (वय ५०, रा. दाढेरा, ता. कळमेश्वर) असे मृताचे नाव असून, ताे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता हाेता, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी पाेलिसांना दिली. गाेन्ही शिवारातील विहिरीत मृतदेह आढळल्याची माहिती गाेन्हीच्या पाेलीस पाटलाने पाेलिसांनी दिली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व तपास सुरू केला हाेता. दरम्यान, बुधवारी मृताच्या नातेवाइकांनी काटाेल पाेलीस ठाणे गाठून ओळख परेड केल्यानंतर मृताची ओळख पटली. या प्रकरणी काटाेल पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, ठाणेदार महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक देवेंद्र वंजारी करीत आहेत.