एक लाखावर शेतकºयांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 01:20 AM2017-10-19T01:20:46+5:302017-10-19T01:20:57+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केल्यानंतर दिवाळीपूर्वी कर्जमाफीच्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून शेतकºयांना सन्मानाने कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र दिल्यामुळे शेतकºयांचा सातबारा कोरा झाला आहे.

Debt Waiver to one lakh farmers | एक लाखावर शेतकºयांना कर्जमाफी

एक लाखावर शेतकºयांना कर्जमाफी

ठळक मुद्दे८३५ कोटी ५५ लाखाचा लाभ : पात्र शेतकºयांना कर्जमुक्ती प्रमाणपत्र वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केल्यानंतर दिवाळीपूर्वी कर्जमाफीच्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून शेतकºयांना सन्मानाने कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र दिल्यामुळे शेतकºयांचा सातबारा कोरा झाला आहे. जिल्ह्यातील सुमारे १ लाख ५ हजार १७७ लाभार्थी शेतकºयांना पात्रतेच्या निकषानुसार लाभ मिळणार असून, सुमारे ८३५ कोटी ५५ लक्ष रुपयांची याअंतर्गत कर्जमाफी मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिली.
या महत्त्वाकांक्षी व ऐतिहासिक कर्जमाफी योजनेपासून पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वितरण तसेच कर्जमुक्त झालेल्या शेतकºयांचा सत्कार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. सुधीर पारवे, आ. समीर मेघे, आ. डॉ. मिलिंद माने तसेच जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते.
कर्जमुक्त शेतकºयांची नावे
नागपूर ग्रामीण : अजय दादाराव ढोले बोरगाव यांचे (९०,८०६), गोविंदा नामदेव वानखेडे येरला (९३३४९) रुपये, कामठी तालुका- किरण दिनेश भारती पावनगाव (२२,४१०) रुपये, बाबा भगवान रासेकर नांदा (२८,४५३) रुपये, हिंगणा तालुका-नत्थुजी नारायण घरत मु. सावंगी देवळी (१,१८,६२८), मनोहर पांडुरंग मानकर सालई मेंढा (१,१७,८०८), कळमेश्वर तालुका- तुळशीराम शंकरराव पांडेकर कोहळी (१,३५,४७८), मधुकर नीळकंठराव मानकर दहेगाव (१,३८,६७९), नरखेड तालुका- रामराव उकंडराव पांडे बानोर (१,०४,३२९), श्रीमती रेणुकाबाई अरुण गावंडे मोगरा (७३,७६७), सावनेर तालुका- संजय रामचंद्र केणे इटनगोटी (७७,९४९), विलास विठ्ठलराव राऊत पाटणसावंगी (१,०६,२०६), पारशिवनी तालुका- धनराज पांडे वराडा (३५,३६७), उत्तम शेषराव ठाकरे केरडी (६०,९२६), रामटेक तालुका- होमराज नामदेव आष्टनकर बोजापूर (३२,३८८), हिरामण श्रीराम हिंगे मानापूर (७५,१६७), मौदा तालुका- पुजाराम दशरथ फुकट माथनी (४५,९६८), मोरेश्वर कोठीराम डांगरे मांगलीतेली. कुही तालुका- सहादेव रामा मरघडे सिल्ली (५९,२५१), युवराज नागोजी वैद्य सिल्ली (७६,७०९), उमरेड तालुका- अंकुश रामाजी सराटे बोरगाव कलांद्री (६७,७३३), केशव शंकर बानाईत बोरगाव कलांद्री (१,४०,६८०), भिवापूर तालुका- पंढरी तुकाराम वैरागडे कोलारी (१,२९,८४९), संतोष तुकाराम शेळके भागेबोरी (१,३०,२९५).\
दिलासा मिळाला, शेतकºयांच्या प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांना कर्जमाफीची योजना जाहीर केली आणि दिवाळीपूर्वीच प्रत्यक्ष अंमलबजावणी करून मोठा दिलासा दिला आहे. कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे नवीन कर्ज मिळत नव्हते. परंतु कर्जमाफी मिळाल्यामुळे सातबारा कोरा झाला आणि आता नवीन कर्जही मिळणार आहे. त्यामुळे नव्या उमेदीने शेती पिकविणार असल्याचा विश्वास कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांनी व्यक्त केला.

Web Title: Debt Waiver to one lakh farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.