जिल्ह्यातील ४९६ शेतकऱ्यांचे कर्ज माफ
By Admin | Updated: November 19, 2015 03:37 IST2015-11-19T03:37:46+5:302015-11-19T03:37:46+5:30
जिल्ह्यातील नागपूर, कामठी, भिवापूर, कुही, उमरेड, मौदा, पारशिवनी, काटोेल, रामटेक व हिंगणा आदी दहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ...

जिल्ह्यातील ४९६ शेतकऱ्यांचे कर्ज माफ
जिल्हाधिकारी : आतापर्यंत ३८९७ शेतकऱ्यांचे कर्ज माफ
नागपूर : जिल्ह्यातील नागपूर, कामठी, भिवापूर, कुही, उमरेड, मौदा, पारशिवनी, काटोेल, रामटेक व हिंगणा आदी दहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेल्या कर्जास शासन निर्णयानुसार ४९६ शेतकऱ्यांच्या ९५.८२ लाख रकमेला कर्जमाफी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी बुधवारी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात कु र्वे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालयाचे रतनसिंह यादव, जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले, जिल्हा विशेष लेखा परीक्षकांचे प्रतिनिधी डी.एस. परारसे, सहायक निबंधक टी.एन.चव्हाण, अशोक गिरी, सुखदेव कोल्हे, प्रकाश भजनी, अंजुषा गराटे, संजया आगरकर आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या संदर्भात तालुकानिहाय प्रकरणे अशी, नागपूर -२ सावकार, शेतकरी संख्या १८, कर्जमाफीची रक्कम ६ ,९७ २७७, हिंगणा - ३ सावकार,शेतकरी संख्या ५,कर्जमाफी ८१९४२ , भिवापूर - १ - सावकार, शेतकरी संख्या ६३,कर्जमाफी १३ , ७५१९५ रुपये, रामटेक - २ सावकार,शेतकरी संख्या २४ ,कर्जमाफी ६, ८६ ७६० रुपये,उमरेड -३० सावकार,शेतकरी संख्या १८८, कर्जमाफी ३२,७६ ९८, कुही - ५ सावकार,शेतकरी संख्या ११ कर्जमाफी ८४ ०९८ पारशिवनी - १६ सावकार,शेतकरी संख्या १५५ कर्जमाफी ३०,५५ २५०,मौदा - ४ सावकार,शेतकरी संख्या १२ कर्जमाफी १ ,३४ १४९ रुपये, काटोल - ४ सावकार,शेतकरी संख्या ६ कर्जमाफी ४४ ,७३१ रुपये, कामठी - ८ सावकार,शेतकरी संख्या १४ कर्जमाफी १,४९ ९७१ रुपये.अशा एकूण ७५ सावकाराकडून ४९६ शेतकऱ्यांनी घेतलेल्या ९५, ८२ २५० रुपयाच्या कर्जाला माफी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यत २०७ सावकारांकडून ३८९७ शेतकऱ्यांचे ६,६५, २७ ३१० रुपयाचे कर्ज माफ करण्यात आले आहे.जिल्ह्यातील पात्र शेतकरी कर्जदारांची प्रकरणे तालुकास्तरीय समितीने अद्याप निकाली काढलेली नाही. अशी प्रकरणे ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत दाखल करण्याची सूचना कुर्वे यांनी केली. परवानाधारक सावकारांनी त्यांचे स्तरावरील पात्र कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज मजुरीचे प्रस्ताव सहायक निबंधक यांचेकडे सादर करावे. असे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)