कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:24 IST2021-01-08T04:24:29+5:302021-01-08T04:24:29+5:30

भाजी व्यापाऱ्याची फसवणूक नागपूर : टाेमॅटाे विक्रीच्या नावाने कळमना येथील एका भाजी व्यापाऱ्याला ४.६६ लाख रुपयांनी फसवण्यात आले. भारतनगर ...

Debt fraud | कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक

कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक

भाजी व्यापाऱ्याची फसवणूक

नागपूर : टाेमॅटाे विक्रीच्या नावाने कळमना येथील एका भाजी व्यापाऱ्याला ४.६६ लाख रुपयांनी फसवण्यात आले. भारतनगर येथील रहिवासी चंद्रमणी बाेरकर हे कळमनामध्ये भाजीचा व्यापार करतात. ते पुण्याच्या सिद्धार्थ काशिद यांच्याकडून टाेमॅटाे खरेदी करीत हाेते. सिद्धार्थने फेब्रुवारी २०१८ मध्ये बाेरकर यांना फाेन करून टाेमॅटाे पाठवत असल्याचे सांगितले. बाेरकर यांनी सिद्धार्थच्या खात्यावर २ लाख रुपये जमा केले. त्यांनी सिद्धार्थवर आधीची १६ हजार रुपये थकबाकी धरून २.१६ लाखाचे टाेमॅटाे पाठवण्यास सांगितले. शिवाय त्यांचे २.५० लाख रुपये किमतीचे प्लॅस्टिकचे १४७१ कॅरेट सिद्धार्थकडे हाेते. तेही पाठवायला सांगितले. दाेन वर्षे लाेटूनही सिद्धार्थने ना टमाटर पाठवले, ना कॅरेट. त्यामुळे बाेरकर यांनी कळमना पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पाेलिसांनी फसवणुकीचे प्रकरण दाखल केले आहे.

Web Title: Debt fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.