कोरोनाबाधितांचे मृत्यू वाढतायेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:07 IST2021-04-16T04:07:52+5:302021-04-16T04:07:52+5:30
रामटेक/ सावनेर /काटोल/ कळमेश्वर/ मौदा/ नरखेड /कुही/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. गुरुवारी ...

कोरोनाबाधितांचे मृत्यू वाढतायेत
रामटेक/ सावनेर /काटोल/ कळमेश्वर/ मौदा/ नरखेड /कुही/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. गुरुवारी तेरा तालुक्यांत ३० रुग्णांची प्राणज्योत मालावली, तर २३५० नव्या रुग्णांची भर पडली. ग्रामीण भागात आतापर्यंत १३४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोरोनाबाधितांची संख्या ७४,३५८ इतकी झाली आहे. गुरुवारी १२१८ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या ग्रामीण भागात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २४,७२० इतकी आहे.
रामटेक तालुक्यात ३४३ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील १०७ तर ग्रामीण भागातील २३ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३७६५ इतकी झाली आहे. यातील १८०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १९५८ इतकी आहे.
नरखेड तालुक्यात २३६ रुग्णांची भर पडली. यात शहरातील ३० तर ग्रामीण भागातील २०६ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२४१ तर शहरात २३६ इतकी झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत ८७, जलालखेडा (६७), मेंढला (२०) तर मोवाड येथे ३२ रुग्णांची नोंद झाली.
काटोल तालुक्यात ११३३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १८४ नागरिकांना कोराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात शहरातील ५८ तर ग्रामीण भागातील १२६ रुग्णांचा समावेश आहे.
कळमेश्वर तालुक्यात २६७ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रातील ५५ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात मोहपा येथे २०, देवबर्डी (१९), तोंडाखैरी, तेलकामठी येथे प्रत्येकी १८, बोरगाव खु. (१२) पानउबाळी, कन्याडोल येथे प्रत्येकी ८, धापेवाडा, तिष्टी (खु), कोहळी, पिपळा येथे प्रत्येकी ७, लोहगड, वरोडा, खुमारी येथे प्रत्येकी ६, घोराड (५), वाढोणा, पारडी देशमुख, सावळी (खु), गळबर्डी, म्हैसेपठार येथे प्रत्येकी ४ रुग्णांची नोंद झाली.
कुही तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रावर ५४१ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १३३ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात कुही शहरात १३, कुही परिसरात (१५), मांढळ (३५), वेलतूर (४२), साळवा (१७) तर तितूर येथे ११ रुग्णांची नोंद झाली.
मौदा तालुक्यात २१८ रुग्णांची नोंद झाली तर एकाचा मृत्यू झाला. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या २१३७ झाली आहे. यातील १०९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या अॅक्टिव्ह रुग्णाची संख्या १००३ इतकी आहे.
हिंगणा तालुक्यात २६४ रुग्णांची भर
हिंगणा तालुक्यात गुरुवारी ११०८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २६४ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे ८४, डिगडोह (३०), टाकळघाट (२२), गुमगाव (१८), हिंगणा (१७), कान्होलीबारा (१३), वडधामना (१०), वागदरा (७), रायपूर (६), कडेगाव (४) तर उमरी वाघ , इसासनी, सुकळी कलार, आमगाव, पिपळधरा , कोतेवाडा येथे प्रत्येकी ३, चिचोली पठार, डेगमाखुर्द , देवळी काळबांडे, कवडस मसाळा , सुकळी घारापुरे , किन्ही मांगली, तुरकमारी, शिरूर, खैरीपन्नासे, दाताळा व पोही येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
सावनेर तालुक्यात मृत्यूचे प्रमाण अधिक
सावनेर तालुक्यात गुरुवारी ८ रुग्णांचा मृत्यू झाला. यात पाटणसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ५, तर चिचोली केंद्राअंतर्गत तिघांचा मृत्यू झाला. गुरुवारी बाधितांच्या संख्येत किंचित घट झाली. तालुक्यात २१८ रुग्णांची नोंद झाली. यात सावनेर शहरातील ५७ तर ग्रामीण भागातील १६१ रुग्णांचा समावेश आहे.