भंगार गाेळा करणाऱ्या महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:27 IST2020-12-15T04:27:20+5:302020-12-15T04:27:20+5:30
माैदा : डम्पिंग यार्ड परिसरात भंगार गाेळा करताना अंगावर मातीचा ढिगारा पडल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

भंगार गाेळा करणाऱ्या महिलेचा मृत्यू
माैदा : डम्पिंग यार्ड परिसरात भंगार गाेळा करताना अंगावर मातीचा ढिगारा पडल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील एनटीपीसी डम्पिंग यार्ड येथे २८ नाेव्हेंबरला दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली हाेती.
लता अरुण पांडे (४५, रा. नवीन कामठी) असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेच्या दिवशी लता ही एनटीपीसी डम्पिंग यार्डात भंगार गाेळा करीत हाेती. अशात अचानक अंगावर मातीचा ढिगारा पडून ती गंभीर जखमी झाली. लागलीच तिला माैदा येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर तिला नागपूर येथील मेयाे हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान शनिवारी (दि. १२) तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस शिपाई राेहित आडे करीत आहेत.