विषबाधेने महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: January 2, 2015 00:52 IST2015-01-02T00:52:31+5:302015-01-02T00:52:31+5:30
विषबाधेने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना हिंगणा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकात्मतानगरात गुरुवारी घडली. दरम्यान, तिला विष पाजण्यात आल्याचा

विषबाधेने महिलेचा मृत्यू
एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर तणाव : विष पाजल्याचा नातलगांचा आरोप
हिंगणा : विषबाधेने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना हिंगणा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकात्मतानगरात गुरुवारी घडली. दरम्यान, तिला विष पाजण्यात आल्याचा आरोप करीत तिच्या नातेवाइकांनी करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
कला सोहन गौर (४५, रा. एकात्मतानगर) असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या पतीचा तीन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला असून, ती एकात्मतानगरात पवन व सूरज या दोन मुलांसोबत राहायची. दरम्यान, शनिवारी (दि. २७) पहाटे ती लघुशंकेसाठी बाहेर गेली आणि लगेच घरात आली. काही वेळातच तिची प्रकृती बिघडल्याने तिने मुलांना जागे केले.
मुलांनी तिला लगेच नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू विषबाधेने झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
तिचा मुलगा पवन व काही नातेवाइकांनी सांगितले की ती सोमवारी शुद्धीवर आली होती. त्यावेळी ती हातवारे करून काही सांगण्याचा प्रयत्न करीत होती. दरम्यान, गुरुवारी तिचा मृत्यू झाला.
तिला विष पाजण्यात आल्याचा आरोप करीत नातेवाकांनी तिचा मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवला आणि दोषींवर गुन्हे नोंदविण्याची मागणी केली. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात तणाव निर्माण झाला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यातच एससीपी प्रदीप माने आणि पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सदर घटनेचा तपास करून गुन्हा नोंदविण्याचे आश्वासन दिले. शिवाय, तिच्या मुलाने दिलेली तक्रार स्वीकारली.