महिन्यात दुसऱ्यांदा वाढली मृतांची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:08 IST2020-12-02T04:08:16+5:302020-12-02T04:08:16+5:30

नागपूर : पाच दिवसापूर्वी नागपूर जिल्ह्यात चाचण्यांची संख्या नऊ हजारावर गेली होती. परंतु सोमवारी ही संख्या ४,५०४ वरच थांबली. ...

The death toll rose for the second time in a month | महिन्यात दुसऱ्यांदा वाढली मृतांची संख्या

महिन्यात दुसऱ्यांदा वाढली मृतांची संख्या

नागपूर : पाच दिवसापूर्वी नागपूर जिल्ह्यात चाचण्यांची संख्या नऊ हजारावर गेली होती. परंतु सोमवारी ही संख्या ४,५०४ वरच थांबली. दैनंदिन रुग्णसंख्येत घट आली. मागील आठवड्याच्या तुलनेत सर्वात कमी २८८ रुग्णांची नोंद झाली. मात्र नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्यांदा मृत्यूची संख्या वाढून १८ वर पोहचली. आरोग्य यंत्रणेसाठी ही चिंतेची बाब ठरली आहे. रुग्णांची एकूण संख्या १,११,७६५ झाली असून, मृतांची संख्या ३,६७२ वर गेली.

नागपूर जिल्ह्यात जुलै महिन्यापर्यंत कोरोनाबाधितांची व मृत्यूची संख्या कमी होती. ऑगस्ट महिन्यापासून या दोन्ही संख्येत प्रचंड वाढ झाली. परंतु मागील तीन महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात कमी रुग्ण व मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. सोमवारी ३,७३३ संशयित रुग्णांची आरटीपीसीआर तर, ७७१ संशयितांची रॅपिड ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली. यात शहरातील २२०, ग्रामीणमधील ५९ तर जिल्हाबाहेरील ९ रुग्ण बाधित आढळून आले. मृतांमध्ये आज जिल्हाबाहेरील मृतांची संख्या मोठी होती. नऊ रुग्णांचे जीव गेले, तर शहरातील सहा व ग्रामीणमधील तीन मृतांचा समावेश होता. पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत आज अधिक २९५ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १,०३,१६७ वर पोहचली आहे. सध्या ४,९२६ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

-३६.२४ टक्के रुग्णात घट

नागपूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात २४,१६३ नव्या रुग्णांची व ९१९ मृत्यूची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यात याच्या दुप्पट ४५,१९९ रुग्ण व १४०६ मृत्यूची भर पडली. मात्र ऑक्टोबर महिन्यापासून या दोन्ही संख्येत घट आली. २४,७७४ रुग्ण व ९५२ मृत्यू नोंदविल्या गेले. नोव्हेंबर महिन्यात ही संख्या आणखी कमी झाली. ८,९७९ रुग्ण व २६९ मृत्यूची नोंद झाली. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात रुग्णसंख्येत ३६.२४ टक्क्याने तर मृतांच्या संख्येत २८.२५ टक्क्याने घट झाली.

-महिन्यानुसार रुग्णसंख्या

महिना रुग्णवाढ

मार्च १६ ००

एप्रिल १३८ १२२

मे ५४१ ४०३

जून१,५०५ ९६४

जुलै५,३९२३,८८७

ऑगस्ट २९,५५५२४,१६३

सप्टेंबर७८,०१२४५,१९९

ऑक्टोबर १०२७८६ २४७७४

नोव्हेंबर १११७६५ ८९७९

(३,२७४ रुग्णांचा घोळ)

-महिन्यानुसार मृत्यूची नोंद

महिना मृत्यू

एप्रिल २

मे ११

जून १५

जुलै ९८

ऑगस्ट ९१९

सप्टेंबर १,४०६

ऑक्टोबर ९५२

नोव्हेंबर २६९

Web Title: The death toll rose for the second time in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.