अंत्यसंस्काराची तयारी करताना तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: August 10, 2016 02:38 IST2016-08-10T02:38:08+5:302016-08-10T02:38:08+5:30

भाडेकरूच्या अंत्यसंस्काराची तयारी करणाऱ्या घरमालक तरुणाला विजेचा जोरदार करंट लागल्याने त्याचा करुण अंत झाला.

The death of the teenager preparing for the funeral | अंत्यसंस्काराची तयारी करताना तरुणाचा मृत्यू

अंत्यसंस्काराची तयारी करताना तरुणाचा मृत्यू

नागपूर : भाडेकरूच्या अंत्यसंस्काराची तयारी करणाऱ्या घरमालक तरुणाला विजेचा जोरदार करंट लागल्याने त्याचा करुण अंत झाला.
मानेवाडा रिंगरोडवरील धाडीवाल लेआऊटमध्ये मंगळवारी सकाळी ९ ते ९.१५ च्या सुमारास ही करुणाजनक घटना घडली.
विपुल विनोद चहांदे (वय २०) असे मृताचे नाव आहे.
शताब्दी चौकाजवळ धाडीवाल लेआऊटमध्ये राहणाऱ्या चहांदे यांच्या घरी श्रीकृष्ण उबाळे भाड्याने राहत होते.
त्यांचे निधन झाल्यामुळे चहांदे पिता-पुत्राने घरासमोर मंडप बांधून अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. सकाळी ९. १५ च्या सुमारास कापडाचा पाल बांधताना सर्व्हिस लाईनला चुकीने स्पर्श झाल्यामुळे विपुलला जोरदार करंट लागला.
त्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. अजनी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. (प्रतिनिधी)

Web Title: The death of the teenager preparing for the funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.