स्वाईन फ्लूने बाळंतीणीचा मृत्यू
By Admin | Updated: March 8, 2015 02:19 IST2015-03-08T02:19:53+5:302015-03-08T02:19:53+5:30
बाळाला जन्म देऊन पाच दिवस होत नाही तोच एका बाळंतीणीचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. मेडिकलमध्ये आतापर्यंत बळीची संख्या ३२ तर नागपूर विभागात ७४ झाली आहे.

स्वाईन फ्लूने बाळंतीणीचा मृत्यू
नागपूर : बाळाला जन्म देऊन पाच दिवस होत नाही तोच एका बाळंतीणीचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. मेडिकलमध्ये आतापर्यंत बळीची संख्या ३२ तर नागपूर विभागात ७४ झाली आहे. गेल्या २४ तासांत १८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत ३७६ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. ज्योत्स्ना मस्के (२६) रा. पांढुर्णा, मध्यप्रदेश असे मृताचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ज्योत्स्ना मस्के हिला ३ मार्च रोजी स्वाईन फ्लूच्या वॉर्डात भरती करण्यात आले होते, परंतु त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तब्बल चार दिवसांनी आज तिचा अहवाल मिळाला. यात तिला स्वाईन फ्लू असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, पाच दिवसांपूर्वी तिने एका खासगी इस्पितळात बाळाला जन्म दिला होता. (प्रतिनिधी)