शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

त्या आरोपींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत परिवर्तित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 20:30 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भंडारा येथील बहुचर्चित प्रीती बारिया खून प्रकरणातील आरोपी अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेच्या शिक्षेत परिवर्तित केली.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : भंडाऱ्यातील प्रीती बारिया खून प्रकरण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भंडारा येथील बहुचर्चित प्रीती बारिया खून प्रकरणातील आरोपी अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेच्या शिक्षेत परिवर्तित केली. ही दुर्मिळ घटना नाही. त्यामुळे या आरोपींसाठी जन्मठेपेची शिक्षा योग्य आहे असा निष्कर्ष न्यायालयाने निर्णयात नोंदवला. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.३० जून २०१८ रोजी भंडारा सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना फाशीची कमाल शिक्षा सुनावली होती. ती शिक्षा कायम करण्यासाठी प्रकरण उच्च न्यायालयात सादर करण्यात आले होते. तसेच, आरोपींनी अपीलद्वारे सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यावर उच्च न्यायालयात ३० ऑगस्ट २०१९ रोजी अंतिम सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर राखून ठेवण्यात आलेला निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आला. उच्च न्यायालयाने केवळ फाशीच्या शिक्षेत बदल केला आहे. आरोपींची अन्य शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. आरोपींना कारावासाच्या सर्व शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत.शेख हा अश्रफीनगर तर, राऊत हा उद्योगनगर येथील रहिवासी असून दोघेही व्यवसायाने एसी मेकॅनिक आहेत. ही घटना ३० जुलै २०१५ रोजी घडली होती. तकिया वॉर्डमधील समृद्धीनगरात बारिया यांचे घर आहे. आरोपींनी सायंकाळी ७.३० च्या सुमारास एसी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यांचा खरा उद्देश दरोडा टाकण्याचा होता. दरम्यान, त्यांनी संधी पाहून प्रीती बारिया (३०) यांना डोक्यावर हातोडीने वार करून ठार मारले. त्याचवेळी बारिया यांचा मुलगा भव्य (९) त्या ठिकाणी आला असता आरोपींनी त्याच्याही डोक्यावर हातोडीने वार केले. त्यामुळे भव्यला कायमचे अपंगत्व आले. त्यापूर्वी आरोपींनी दुपारी म्हाडा कॉलनीतील रवींद्र शिंदे यांच्या घरीदेखील एसी दुरुस्तीच्या बहाण्याने प्रवेश केला होता व त्यांची मुलगी अश्विनी हिच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने वार केले होते. तेव्हापासून अश्विनीलाही कायमचे अपंगत्व आले. एसी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करणे, संधी पाहून घरातील व्यक्तींचा खून करणे व त्यानंतर घरातील मुद्देमाल चोरून नेणे ही आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत होती. उच्च न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. नीरज जावडे, आरोपींतर्फे अ‍ॅड. ओमप्रकाश गुप्ता तर, बारियातर्फे अ‍ॅड. नीरज खांदेवाले यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCapital Punishmentमृत्यूदंडLife Imprisonmentजन्मठेपMurderखून