पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:58 IST2021-02-05T04:58:34+5:302021-02-05T04:58:34+5:30
वाहतूक शाखेच्या सीताबर्डी झोनमध्ये कार्यरत असलेले बागडे पोलीस लाइन टाकळी येथे राहत होते. सोमवारी नेहमीप्रमाणे कर्तव्यावर आले. मात्र प्रकृती ...

पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
वाहतूक शाखेच्या सीताबर्डी झोनमध्ये कार्यरत असलेले बागडे पोलीस लाइन टाकळी येथे राहत होते. सोमवारी नेहमीप्रमाणे कर्तव्यावर आले. मात्र प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने ते घरी परतले. रुग्णालयातून जुजबी उपचार घेतल्यानंतर मंगळवारी दुपारनंतर त्यांची पुन्हा प्रकृती खालावली. त्यांना मेयोत नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बागडेंचा मृत्यू नेमका कसा झाला ते तूर्त स्पष्ट झाले नाही. मात्र, अतिउच्च रक्तदाबामुळे बागडे यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
----
रेल्वेच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
नागपूर : भरधाव रेल्वेने धडक दिल्यामुळे हरिश्चंद्र वासुदेवराव विश्वकर्मा (वय ७४) यांचा करुण अंत झाला. ते झिंगाबाई टाकळीतील डोळे लेआउटमध्ये राहत होते. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास बाबा फरिदनगर मानकापूर रेल्वे क्रॉसिंगवर त्यांना रेल्वेची धडक बसली. कमलेश हरिश्चंद्र विश्वकर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी अपघाताची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----
तरुणाने लावला गळफास
नागपूर : यशोधरानगरातील एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. प्रवीण विठोबाजी शहाणे (वय ३०) असे मृताचे नाव आहे. प्रवीण कांजी हाउस चौकाजवळ राहत होता. मंगळवारी सकाळी ८.३० च्या सुमारास त्याने गळफास लावून घेतला. त्याची आई साधना विठोबाजी शहाने यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
-----