शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्याच्या मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:29 IST

क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यासोबत झालेल्या वादाचे स्वरूप हाणामारीत झाल्याने जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे आता मारहाण करणाऱ्या मामा-भाच्यावर कारागृहात जाण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देक्षुल्लक कारणावरून वाद : मामा-भाच्यावर कारागृहात जाण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यासोबत झालेल्या वादाचे स्वरूप हाणामारीत झाल्याने जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे आता मारहाण करणाऱ्या मामा-भाच्यावर कारागृहात जाण्याची वेळ आली आहे. विशाल उर्फ बाळू नगराळे आणि आयुष मेश्राम असे मारहाण करणाऱ्या मामा-भाच्याचे नाव आहे. तर, विनोद नामदेवराव नारायणे (वय ५२) असे मृताचे नाव आहे.मृत विनोद नारायणे आणि आरोपींची घरे इमामवाड्यातील पाच नल चौकाजवळ आहे. ७ आॅगस्टला दुपारी १ ते २ च्या दरम्यान कचरा जाळण्याच्या क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी विशाल आणि आयुषने विनोद नारायणे यांना जबर मारहाण केली. मारहाणीत ते खाली पडून त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. परिणामी त्यांना उपचाराकरिता मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी प्रारंभी मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वैद्यकीय अहवालानंतर या प्रकरणात आरोपींविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाDeathमृत्यू