काच पोटात घुसल्याने व्यक्तीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:10 IST2021-07-14T04:10:37+5:302021-07-14T04:10:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - दुचाकीचा अपघात झाल्यानंतर शर्टात दडवून ठेवलेली काचेची बाटली फुटली. तिचे काच पोटात खुपसले गेल्याने ...

Death of a person due to glass penetrating into the abdomen | काच पोटात घुसल्याने व्यक्तीचा मृत्यू

काच पोटात घुसल्याने व्यक्तीचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - दुचाकीचा अपघात झाल्यानंतर शर्टात दडवून ठेवलेली काचेची बाटली फुटली. तिचे काच पोटात खुपसले गेल्याने राजेश सुशील वऱ्हाडे (वय ३५)नामक व्यक्तीचा करुण अंत झाला. कळमन्यात सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली.

राजेश आणि त्याचा मित्र मोहम्मद शोएब (वय २४) हे दोघेही तलमले ले-आऊटमध्ये राहत होते. सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास शोएबच्या दुचाकीने वेगात जात होते. पाण्याच्या टँकरला ओव्हरटेक करताना भरधाव दुचाकी अनियंत्रित झाली. त्यामुळे दोघेही खाली पडले. राजेशने त्याच्या शर्टात काचेची बाटली ठेवली होती. ती फुटल्याने काचेचे तुकडे राजेशच्या पोटात घुसले. परिणामी तो गंभीर जखमी झाला. त्याला मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघाताला आरोपी शोएबचा हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचे लक्षात उघड झाले. सुशील कमलाप्रसाद वऱ्हाडे (वय ६०) यांची तक्रार नोंदवून कळमना पोलिसांनी आरोपी शोएब विरुद्ध गुन्हा दाखल केला.

---

Web Title: Death of a person due to glass penetrating into the abdomen