शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

हरीश अड्याळकर यांचे निधन; लोहियांचा सच्चा समाजवादी हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 10:53 PM

गांधीवाद आणि लोहियावाद विचारांची आजीवन जोपासना करणारे ज्येष्ठ सामाजसेवक आणि लोहिया अध्ययन केंद्राचे महासचिव हरीश अड्याळकर यांचे गुरुवारी निधन झाले.

ठळक मुद्देगांधीवाद, लोहियावाद आजीवन जोपासला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधीवाद आणि लोहियावाद विचारांची आजीवन जोपासना करणारे ज्येष्ठ सामाजसेवक आणि लोहिया अध्ययन केंद्राचे महासचिव हरीश अड्याळकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्यावर मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

अड्याळकर म्हणजे एक सच्चा समाजवादी. उमेश चौबे यांच्यानंतर खऱ्या अर्थाने समाजसेवेचे व्रत स्वीकारून कार्य करणारा एक सच्चा कार्यकर्ता आज निवर्तला. मुंबई येथे रेल्वेमध्ये सेवा देताना चळवळ्या स्वभावानुसार ते रेल्वे युनियनशी जुळले. अनेक विचारांचा अभ्यास करताना आधी डाव्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. मात्र पुढच्या काळात राममनोहर लोहिया यांचा झंझावात त्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला. १९६५ साली ते मुंबई सोडून नागपूरला आले ते लोहिया विचारांचा पाईक म्हणूनच.

अड्याळकर यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी मोठी लढाई लढली. १९७४ साली नागपूर मंडळात झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संप आंदोलनाचे नेतृत्व केले. ते नागपूर रेल्वे कामगार युनियनचे सचिवही राहिले. या काळात ते भूमिगतही होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी आणीबाणीला विरोध केला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. ते डॉ. राममनोहर लोहिया व त्यानंतर जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या समाजवादी नेत्यांच्या सोबत काम केले होते. त्यांना नागपुरातील जॉर्ज फर्नांडिस म्हटले जात होते. स्वत:ला लोहिया यांचे समाजवादी पाईक म्हणणाऱ्या अड्याळकर यांनी सुभाष रोडवरील लोहिया अध्ययन केंद्राची धुरा गेल्या ४० वर्षांपासून सांभाळली होती. त्या माध्यमातून लोहिया विचारांच्या प्रचार व प्रसाराचे काम त्यांनी केले.

अनेक लेखक, साहित्यिक आणि रेल्वे युनियनच्या नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या निधनाने एक सच्चा समाजवादी आणि गांधी आणि लोहिया विचारांचा पाईक हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :Deathमृत्यू