शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील मुंबई स्फोटाचा आरोपी गनीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 20:23 IST

मुंबईसह अवघ्या देशाला हादरे देणाऱ्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क (वय ६८) याचा अखेर आज येथील मेडिकल रुग्णालयात मृत्यू झाला. पॅरालिसिस झाल्यामुळे गेल्या काही दिवसापासून त्याची प्रकृती चांगली नव्हती.

ठळक मुद्देप्रकृती अस्वास्थ्यामुळे दगावला : कारागृह प्रशासनात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईसह अवघ्या देशाला हादरे देणाऱ्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क (वय ६८) याचा अखेर आज येथील मेडिकल रुग्णालयात मृत्यू झाला. पॅरालिसिस झाल्यामुळे गेल्या काही दिवसापासून त्याची प्रकृती चांगली नव्हती.मार्च १९९३ ला मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गनीला आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. नोव्हेंबर २०१२ ला त्याला येरवडा कारागृहातून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले होते. तेव्हापासून तो नागपूर मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत होता.अटक केल्यानंतर तपास यंत्रणांकडे गनीने आरडीएक्स पेरून मुंबईतील सेंच्युरी बाजारात बॉम्बस्फोट घडवून आणल्याची कबुली दिली होती. स्फोट कसे घडवून आणले, कट कुठे आणि कसा रचला, त्याचीही माहिती त्याने तपास यंत्रणेकडे दिली होती. या स्फोटात ११३ लोकांचा मृत्यू झाला होता. गनीचा केवळ याच स्फोटात नव्हे तर मुंबईत ठिकठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या कटातही सहभाग असल्याचे सांगितले जात होते. पाकिस्तानच्या मदतीने या स्फोटाचे कटकारस्थान रचणारा दाऊद इब्राहिम हा त्यावेळी पळून गेला होता. तर, गनीसोबत नंतर क्रमश: याकूब मेमन आणि अन्य काही जणांनाही पोलिसांनी अटक केली होती. याकूबला या स्फोटाच्या आरोपात नागपूर कारागृहात फाशी देण्यात आले होते. गनीसोबत फाशी तसेच नंतर आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावलेले अनेक आरोपी अजून नागपूरच्या कारागृहात बंदिस्त आहेत, हे विशेष !अब्दुल गनीला वर्षभरापूर्वी पॅरालिसिसचा अटॅक आला होता. बरेच दिवस तो बेडवरच होता. गेल्या काही दिवसांपासून त्याला चालता येत असले तरी त्याची प्रकृती सारखी ढासळतच होती. २२ एप्रिलला त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथून त्याला दुसºया दिवशी सुटी मिळाली. त्यानंतर कारागृहातील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी (२५ एप्रिल) दुपारी ११.४० ला त्याची प्रकृती ढासळली. तो बेशुद्ध पडल्यामुळे त्याला पुन्हा मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.कारागृह प्रशासनात धावपळमुंबई स्फोटाच्या आरोपीचा मृत्यू झाल्याचे वृत्त कळताच प्रशासनात धावपळ निर्माण झाली. कारागृह अधीक्षक राणी भोसले यांनी लगेच उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांना तर देसाई यांनी कारागृह प्रशासनातील पुणे, मुंबईच्या शिर्षस्थांना ही माहिती कळविली. गनीच्या मुंबईतील नातेवाईकांनाही कळविण्यात आले. ते येथे रात्री उशिरापर्यंत दाखल होण्याची शक्यता कारागृह प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईBlastस्फोटDeathमृत्यूjailतुरुंग