शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 20:26 IST

शेतात गुरांना पाणी पाजत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला चढविला. त्यात त्या शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना (धानोली, ता. कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा) शिवारात सोमवारी सकाळी घडली असून, हा परिसर मासोद (ता. काटोल) लगत असल्याने या भागात वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमासोद शिवारात प्रचंड दहशत : गुरांना पाणी पाजत असताना चढवला हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कोंढाळी) : शेतात गुरांना पाणी पाजत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला चढविला. त्यात त्या शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना (धानोली, ता. कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा) शिवारात सोमवारी सकाळी घडली असून, हा परिसर मासोद (ता. काटोल) लगत असल्याने या भागात वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.विठोबा दसरू वडुले (६२, रा. धानोली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची धानोली शिवारात अडीच एकर शेती असल्याने ते सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास शेतात गेले होते. दरम्यान, ते गुरांना पाणी पाजत असतानाच झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.ते दुपारपर्यंत घरी परत न असल्याने मुलगा शेषराव यांनी शेत गाठले. ते शेतात दिसत नसल्याने त्यांनी बारकाईने शोध घ्यायला सुरुवात केली. त्यात त्यांना चपला व रक्त जमिनीवर पडले असल्याचे आढळून आले. त्या आधारे त्यांनी शोध घेतला असता, विठोबा यांचा मृतदेह उंबरविहिरीत परिसरातील जंगलात आढळून आला.माहिती मिळताच बोर व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक गवई, सहायक उपवन संरक्षक गजानन बोबडे, वनपरिक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वाघाने विठोबा यांच्या मानेचा लचका तोडल्याचेही आढळून आले. त्याने विठोबा यांना धानोली शिवारातून उंबरविहिरीच्या जंगलात फरफटत आणल्याचेही स्पष्ट झाले. हा परिसर काटोल तालुक्यालगत असल्याने वाघाचा या तालुक्यातील मासोद, कोंढाळी परिसरात वावर वाढला आहे. त्यामुळे या भागातही वाघाची दहशत निर्माण झाली आहे.जंगलात पाण्याची टंचाईउंबरविहिरी परिसर हा बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कक्ष क्रमांक - ४९ अंतर्गत येतो. या परिसरात अडीच वर्षीय पिंकी नामक वाघिण व युवराज नामक वाघाचा वावर आहे. विठोबा यांच्यावर नेमका कोणत्या वाघाने हल्ला चढविला, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. अभयारण्याच्या या भागातील बहुतांश जलस्रोत कोरडे पडले असून, कृत्रिम पाणवठ्यांमध्येही प्यायला पाणी मिळत नसल्याने या वन्यप्राण्यांनी पाण्याच्या शोधात त्यांचा मोर्चा शेत व नागरी वस्त्यांकडे वळविला आहे. शिवाय, पिंकी व युवराजचा मासोद, घोटीवाडा व कोंढाळी परिसरात मुक्त संचार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यूFarmerशेतकरी