ऑन ड्युटी पोलिसाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:15 IST2021-02-06T04:15:07+5:302021-02-06T04:15:07+5:30

शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास ते नेहमीप्रमाणे कर्तव्यावर आले. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने सहकाऱ्यांनी आवळेंना आधी खासगी आणि नंतर ...

Death of an on-duty policeman | ऑन ड्युटी पोलिसाचा मृत्यू

ऑन ड्युटी पोलिसाचा मृत्यू

शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास ते नेहमीप्रमाणे कर्तव्यावर आले. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने सहकाऱ्यांनी आवळेंना आधी खासगी आणि नंतर मेयो इस्पितळात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून कपिलनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे, वाहतूक शाखेत ऑन ड्युटी पोलिसांचा मृत्यू झाल्याची तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. गिट्टीखदानमधील बागडे यांचाही असाच तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता.

----

बहिणीकडे पाहुणा आलेल्या भावाचा मृत्यू

नागपूर : बहिणीकडे पाहुणा म्हणून आलेल्या भावाची अचानक प्रकृती बिघडली आणि त्याचा करुण अंत झाला. विजय रामकृष्ण दंदेवार (वय ४५) असे मृताचे नाव आहे. ते सदरमध्ये राहत होते. २९ जानेवारीला ते त्यांच्या गिट्टीखदानमध्ये राहणाऱ्या बहिणीकडे पाहुणे म्हणून आले होते. तेथे त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना मेयोत दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना शुक्रवारी ५ फेब्रुवारीला सकाळी ९.३० ला त्यांचा मृत्यू झाला. गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---

कुख्यात समीर खान जेरबंद

नागपूर : शस्त्राच्या धाकावर यशोधरानगर परिसरात दहशत पसरवत असलेला कुख्यात गुंड समीर खान समशेर खान (वय २८) याला यशोधरानगर पोलिसांनी अटक केली.

समीर खान कुख्यात गुंड असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी पोलिसांनी एमपीडीएसह वेगवेगळ्या प्रतिबंधक कारवाया केलेल्या आहेत. नुकताच तो कारागृहातून बाहेर आला आणि त्याने पुन्हा गुंडगिरी सुरू केली. शुक्रवारी दुपारी तो यशोधरानगरात शस्त्राच्या धाकावर दहशत पसरवत असल्याचे कळताच ठाणेदार अशोक मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समीरखानच्या मुसक्या बांधल्या.

----

Web Title: Death of an on-duty policeman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.