अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:08 IST2021-05-06T04:08:25+5:302021-05-06T04:08:25+5:30

रामटेक : भरधाव दुचाकीसमाेर अचानक रानडुक्कर आडवे आल्याने खाली पडून जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रामटेक ...

Death of a cyclist in an accident | अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

रामटेक : भरधाव दुचाकीसमाेर अचानक रानडुक्कर आडवे आल्याने खाली पडून जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचाळा शिवारात नुकतीच घडली.

विजय गुलाबराव वैद्य (५६, रा. रामाजीनगर, रामटेक) असे मृताचे नाव आहे. विजय वैद्य हे आपल्या पत्नीसह दुचाकीने पांढराबाेडी (जि. भंडारा) येथे गेले हाेते. दरम्यान, रामटेक येथे परत येताना पंचाळा फाटाजवळ अचानक रानडुक्कर आडवे येऊन त्यांच्या दुचाकीला धडकले. यात ते खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना नागपूर येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान १७ एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी धंताेली नागपूर पाेलिसांच्या सूचनेवरून रामटेक पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस नाईक दीपक यादव करीत आहेत.

Web Title: Death of a cyclist in an accident