अधिवेशनाच्या बंदोबस्ताला आलेल्या हवालदाराचा मृत्यू

By Admin | Updated: December 5, 2014 00:43 IST2014-12-05T00:43:53+5:302014-12-05T00:43:53+5:30

हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्ताला आलेल्या एका पोलीस हवालदाराचा थंडीने गारठून मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. सुधाकर नारायणराव गंथाळे (वय ४९) असे मृत हवालदाराचे नाव

Death of the custodian of the convention | अधिवेशनाच्या बंदोबस्ताला आलेल्या हवालदाराचा मृत्यू

अधिवेशनाच्या बंदोबस्ताला आलेल्या हवालदाराचा मृत्यू

थंडीचा फटका : प्रशासन हादरले
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्ताला आलेल्या एका पोलीस हवालदाराचा थंडीने गारठून मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. सुधाकर नारायणराव गंथाळे (वय ४९) असे मृत हवालदाराचे नाव असून ते हिंगणघाट (जि. वर्धा) येथील पोलीस ठाण्यात कार्यरत होते. अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी नागपुरात मोठ्या संख्येत ठिकठिकाणचा पोलीस ताफा बोलवून घेण्यात आला आहे. वाहनचालक हवालदार गंथाळे हेसुद्धा आपल्या सहकाऱ्यांसह पोलीस जीप घेऊन नागपुरात आले होते. बुधवारी रात्री त्यांनी शहर पोलीस परिवहन कार्यालयाच्या जवळ असलेल्या प्राथमिक शाळेच्या मैदानात सुमो (जीप) उभी केली आणि जीपमध्येच ते झोपले. सकाळचे ९.४५ वाजले तरी गंथाळे तयार झाले नसल्याचे बघून त्यांचे सहकारी जीपजवळ आले. त्यांनी झोपून आहे असे समजून गंथाळे यांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची हालचाल होत नव्हती. त्यामुळे गंथाळे यांचे सहकारी गजानन महादेवराव सातपुते (वय ४५) यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली. अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दावे आणि वास्तविकता
गंथाळे यांचा मृत्यू नेमका कसा झाला, ते स्पष्ट झाले नाही. मात्र, कडाक्याच्या थंडीनेच त्यांचा बळी घेतला असावा, असा अंदाज आहे. बंदोबस्तासाठी पोलिसांच्या राहण्याची आणि जेवण्याची उत्तम व्यवस्था केल्याचा दावा स्थानिक अधिकारी करतात. मात्र, या प्रकरणाने या दाव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लावले आहे. निवासाची व्यवस्था असताना गंथाळे जीममध्ये कसे झोपले, असा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Death of the custodian of the convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.