वासराचा हाेरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:09 IST2021-05-25T04:09:06+5:302021-05-25T04:09:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा / मेंढला : शेतातील गाेठ्याला लागलेली आग वेळीच नियंत्रणात न आल्याने गाेठ्यातील वासराचा हाेरपळून मृत्यू ...

वासराचा हाेरपळून मृत्यू
लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा / मेंढला : शेतातील गाेठ्याला लागलेली आग वेळीच नियंत्रणात न आल्याने गाेठ्यातील वासराचा हाेरपळून मृत्यू झाला. शिवाय, आत ठेवलेले शेती उपयाेगी साहित्य व गुरांचे वैरण पूर्णपणे जळाले. यात किमान ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली. ही घटना नरखेड तालुक्यातील उमरी (वडेगाव) शिवारात साेमवारी (दि. २४) दुपारी घडली.
नरेश भैसे, रा. उमरी (वडेगाव), ता. नरखेड यांची उमरी शिवारात शेती असून, शेतात गाेठा आहे. या गाेठ्याला साेमवारी दुपारी अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच शेतकऱ्यासह इतरांनी ती आग विझविण्यासाठी आटाेकाट प्रयत्न केले. मात्र, या आगीला गाेठ्यात बांधलेल्या वासराचा हाेरपळून मृत्यू झाला. शिवाय, आत ठेवलेले पाइप, इलेक्ट्रिक मोटर, कुटार व इतर साहित्य जळून राख झाले.
आगीचे कारण कळू शकले नाही. मात्र, या आगीत किमान ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती नरेश भैसे यांनी दिली. माहिती मिळताच स्थानिक तलाठी व पाेलीस कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, पंचायत समिती सदस्य महिंद्रा गजबे, सतीश रेवतकर यांच्या उपस्थितीत पंचनामा केला. या शेतकऱ्याला शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
===Photopath===
240521\img-20210524-wa0130.jpg
===Caption===
फोटो ओळी. आगीत जाळून खाक झालेल्या गोठ्याची पाहणी करताना सभापती नीलिमा रेवरकर.