स्वाईन फ्लूने दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: May 6, 2015 02:08 IST2015-05-06T02:08:36+5:302015-05-06T02:08:36+5:30
उपराजधानीचे तापमान ४२ अंशांच्यावर गेले आहे. स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी...

स्वाईन फ्लूने दोघांचा मृत्यू
नागपूर : उपराजधानीचे तापमान ४२ अंशांच्यावर गेले आहे. स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी मृत्यूचे सत्र सुरूच आहे. गेल्या पाच दिवसांत स्वाईन फ्लूने दोन रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यूने नागपूर विभागात मृतांची संख्या १२० झाली असून पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ५९५ झाली आहे.
रामदास लांजे (५५) रा. सडक अर्जुनी, गोंदिया व शीला राठोड (४८) यवतमाळ असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामदास लांजे यांना शुक्रवारी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. त्यांच्यात स्वाईन फ्लूचे लक्षणे दिसताच स्वाईन फ्लू वॉर्डात हलविण्यात आले. शनिवारी रात्री त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. शीला राठोड गेल्या काही दिवसांपासून मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात उपचाराला होत्या. सुरुवातीपासूनच त्यांची प्रकृती गंभीर होती. सोमवारी रात्री २ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तज्ज्ञाच्या मते, तापमान वाढल्याने स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या कमी झाली आहे. परंतु जे रुग्ण येत आहेत ते अत्यंत गंभीर अवस्थेत येत आहेत. यामुळे मृत्यूची संख्या वाढत आहे. यामुळे लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)