शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत मुकबधीर गर्भवतीला कळा ‘आरपीएफ’ची मदत, प्रसुती सुलभ

By नरेश डोंगरे | Updated: May 21, 2024 18:59 IST

दिव्यांगांच्या कोचमध्ये महिला तळमळत होती : आरपीएफने दाखवली तत्परता; माता-शिशू दोघेही स्वस्थ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) राबविण्यात येणाऱ्या 'ऑपरेशन मातृशक्ती' अंतर्गत धावत्या रेल्वे गाडीत प्रसवपिडेने तळमळत असलेल्या एका मुकबधित महिलेला आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदतीचा हात दिला. त्यामुळे तिची प्रसुती सुलभ होण्यास मदत झाली. या घटनेशी संबंधित एक व्हिडीओ रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर व्हायरल झाल्याने मदत करणाऱ्या महिला-पुरूष आरपीएफ जवानांचे सर्वत्र काैतुक होत आहे.

घटना महाराष्ट्र एक्सप्रेसमधील आहे. सोमवारी ही गाडी गोंदियाहून नागपूरकडे येत असताना दिव्यांगाच्या कोचमध्ये बसलेली एक मुकबधिर गर्भवती महिला प्रसवकळेमुळे तळमळू लागली. कुणीतरी ही माहिती रेल्वेच्या हेल्पलाईनवर कळवली. त्यानंतर ती आरपीएफच्या अधिकाऱ्यांना कळली. ही गाडी काही वेळेतच कामठीला पोहचणार होती. ते लक्षात घेऊन आरपीएफचे सुरक्षा आयुक्त दीपचंंद्र आर्य यांनी सहायक आयुक्त विनोद लांजीवार यांच्या मार्फतीने 'ऑपरेशन मातृशक्ती' राबविणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना तातडीने पीडित महिलेच्या मदतीला धावण्याचे आदेश दिले. त्यानुसार, कामठी स्थानकावर आरपीएफच्या महिला अंमलदार पिज्मा शर्मा आणि उपनिरीक्षक विजय भालेकर यांनी गाडी कामठीच्या फलाट क्रमांक १ वर थांबताच पीडित महिलेला अलगद उचलून फलाटावरून वाट काढत बाहेर आणले. लगेच एक ऑटो बोलवून त्या महिलेला कामठीच्या रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात दाखल होताच या महिलेले एका शिशूला जन्म दिला. तिची आणि बाळाची दोघांचीही प्रकृती चांगली आहे. आरपीएफकडून तात्काळ मायेची उब लाभल्यानेच हे सर्व व्यवस्थित होऊ शकले. दरम्यान, पीडित महिलेला दोन्ही हातात उचलून आरपीएफच्या पिज्मा शर्मा आणि विजय भालेकर धावत-धावत स्थानकाबाहेर जात आहेत, ऑटो बोलवून त्यात तिला रुग्णालयाकडे नेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. तेव्हापासून त्यांच्यावर चोहोबाजूने स्तुतीसुमने उधळली जात आहे.

भाषेवर भावनांची मातमुकबधिर असल्याने या महिलेला तिच्याशी संबंधित सविस्तर माहिती देता येत नव्हती. मात्र, डॉक्टर आणि आरपीएफच्या महिला कर्मचाऱ्यांनी तिला तिच्याकडून संकेतासंकेताने बरिचशी माहिती काढून घेतली. तिच्याजवळ एक आधारकार्ड होते. त्यावरच्या फोटोवरून ते तिचेच असावे आणि तिचे नाव विमला तेलम असावे, असा अंदाज आहे. दरम्यान, आरपीएफने तिच्या पतीलाही शोधून काढले असून, तोसुद्धा दिव्यांग असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर