कळमना, जरीपटक्यात प्राणघातक हल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:09 IST2021-03-14T04:09:29+5:302021-03-14T04:09:29+5:30
अरविंद ऊर्फ बंटी अशोक दमसुरे (वय २८, रा. कुशीनगर जरीपटका) हा त्याचा मित्र मनोज लिल्हारेसोबत शुक्रवारी रात्री ८ ते ...

कळमना, जरीपटक्यात प्राणघातक हल्ले
अरविंद ऊर्फ बंटी अशोक दमसुरे (वय २८, रा. कुशीनगर जरीपटका) हा त्याचा मित्र मनोज लिल्हारेसोबत शुक्रवारी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान कळमनातील पुंजाराम वाडी त्रिकोणी गार्डनजवळून जात होता. आरोपी कपिल मस्करे आणि राजा गेडाम, सनी मरकर, सोनू यादव, तसेच करण नामक साथीदाराने बंटी आणि मनोजवर हल्ला चढविला. आरोपींनी दगडाने ठेचल्याने हे दोघेही गंभीर जखमी झाले. आजूबाजूची मंडळी धावल्याने आरोपी पळून गेले. बंटीने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अशाच प्रकारे जरीपटक्यातील दूध विक्रेता गणेश कडूकार आणि खुशाल रायपुरे हे दोघे मोटारसायकलने जात होते. आरोपी धर्मेंद्र रायपुरे, विकास राजेश भुजाडे आणि शाकीर या तिघांनी दूध विक्रेता गणेश, तसेच खुशालसोबत वाद घातला. त्यानंतर त्यांना लोखंडी रॉडने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. जरीपटका पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
----