कोरड्या नहरात आढळली मृत मगर

By Admin | Updated: February 2, 2017 02:13 IST2017-02-02T02:13:43+5:302017-02-02T02:13:43+5:30

वाकी परिसरातून जाणाऱ्या पेंच प्रकल्पाच्या कोरड्या नहरात मृतावस्थेत मगर आढळून आली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली.

Dead but found in dry bath | कोरड्या नहरात आढळली मृत मगर

कोरड्या नहरात आढळली मृत मगर

वाकी येथील प्रकार : कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा संशय
खापा : वाकी परिसरातून जाणाऱ्या पेंच प्रकल्पाच्या कोरड्या नहरात मृतावस्थेत मगर आढळून आली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली. मगरीच्या तोंडाचे लचके तोडलेल्या स्थितीत होते. त्यामुळे कुत्र्यांनी मगरीवर हल्ला चढवून मारले असावे, अशी शक्यता आहे. ही बाब वन विभागाला माहिती होताच घटनास्थळी जाऊन मगरीचा मृतदेह ताब्यात घेतला.
खापा वन परिक्षेत्राच्या वाकी बिटअंतर्गत बबलू गायकवाड, रा. वाकोडी यांचे शेत आहे. या शेतालगतच पेंच प्रकल्पातून कोराडीकडे जाणारा कालवा आहे. सध्या या कालव्यातून पाणी सोडणे बंद आहे. त्यामुळे तो कालवा कोरडा आहे. अशात मंगळवारी दुपारच्या सुमारास काही शेतकऱ्यांना मृतावस्थेत मगर आढळून आली. त्यामुळे ती मगर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. याबाबत खापा वन विभागातील अधिकाऱ्यांना बुधवारी माहिती मिळताच त्यांनी सेमिनरी हिल येथील अधिकाऱ्यांना सूचना दिली. त्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
मृत मगरीचे वय अंदाजे तीन वर्ष असून चार फूट लांब आहे. मगरीचे तोंड फुटलेल्या स्थितीत होते. कालव्यातील पाण्याच्या प्रवाहात ती मगर आली असावी आणि प्रवाहामुळे जाळ्याला अडकल्याने तोंड फुटून त्यातच तिचा मगरीचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता आहे. दुसरीकडे कोरड्या कालव्यात असलेल्या मगरीवर कुत्र्यांनी हल्ला चढवून ठार केले असावे. त्यामुळेच मगरीचे तोंड लचके तोडलेल्या स्थितीत आढळले, अशीही शक्यता आहे.
याबाबत सहायक वनसंरक्षक राजन मेश्राम यांनी सांगितले की, नागपूर वन विभागाने मगरीचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कारवाई त्यांच्याकडूनच पूर्ण केली जाईल. दरम्यान, या भागात मृत मगर आढळल्याने आणखी काही मगरी असाव्यात अशीही शक्यता असून नागरिकांमध्ये कमालीचे भीतीयुक्त वातावरण आहे. (प्रतिनिधी)

पहिलीच घटना
कालव्यात मगर आढळल्याची ही पहिलीच घटना आहे. मात्र पेंच प्रकल्पात, नदीत मगरी आढळल्याची अनेक उदाहरणे आहेत. तेथूनच ही मगर कालव्याद्वारे वाकीपर्यंत आली असावी, अशी शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी कोलीतमारा परिसरात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीने हल्ला चढविला होता. त्यानंतरही एका मुलीवर हल्ला चढविल्याची घटना घडली होती. त्यामुळे पेंचमध्ये मगरी असण्यावर शिक्कामोर्तब झाले होते.

Web Title: Dead but found in dry bath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.