डीसीपीचे महिला फोटोग्राफरशी असभ्य वर्तन

By Admin | Updated: June 14, 2016 02:18 IST2016-06-14T02:18:11+5:302016-06-14T02:18:11+5:30

परिमंडळ ५ चे उपायुक्त अभिनाशकुमार यांनी सोमवारी एका दैनिकाच्या महिला वृत्तछायाचित्रकाराशी असभ्य वर्तन करून

DCP behave rude behavior of female photographers | डीसीपीचे महिला फोटोग्राफरशी असभ्य वर्तन

डीसीपीचे महिला फोटोग्राफरशी असभ्य वर्तन

मृताच्या नातेवाईकांनाही धमकावल्याचा आरोप : पोलिसानेही पकडली एकाची कॉलर
नागपूर : परिमंडळ ५ चे उपायुक्त अभिनाशकुमार यांनी सोमवारी एका दैनिकाच्या महिला वृत्तछायाचित्रकाराशी असभ्य वर्तन करून तिचा कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बाजुला असलेल्या दुसऱ्या एका छायाचित्रकाराची पोलिसांनी कॉलर पकडली. तर, मृताच्या नातेवाईकांनाही अभिनाशकुमार यांनी धमकावल्याचा शोकसंतप्त नागरिकांनी आरोप लावल्याने पत्रकारजगतात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
रविवारी झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे जरीपटक्यातील समतानगरात प्रचंड तणावाचे वातावरण होते.
पोलिसांनी लाठीमार केल्याने परिस्थिती चिघळली. त्याचे वृत्तसंकलन आणि छायाचित्रण करण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सोमवारी दुपारी १२ पासून समतानगर, जरीपटका परिसरात होते. काही पोलीस अधिकारी, कर्मचारी अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांवर लाठ्या चालवत असल्याचे कळाल्याने दुपारी २ ला छायाचित्रकारांनी तिकडे धाव घेतली.

Web Title: DCP behave rude behavior of female photographers