शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भांडण सोडविण्यासाठी धावलेल्या मुलीवर पित्याचा चाकू हल्ला; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2022 17:29 IST

आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली, त्यांनी आरोपीला आवरले.

ठळक मुद्देमुलगी जबर जखमी : कपिल नगरातील घटना

नागपूर : आईशी भांडण करणाऱ्या वडिलाला समजाविण्यासाठी गेलेल्या तरुण मुलीवर आरोपी पित्याने चाकू हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली. कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ही घटना घडली. मानसी शालीकराम बावणे (वय २३) असे जखमी मुलीचे नाव आहे.

कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तारखेश्वर नगर आहे. येथे राहणारा आरोपी शालिकराम सोमाजी बावणे (५०) हा शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास त्याच्या पत्नीसोबत वाद घालत होता. दारूच्या नशेत शालिकराम त्याच्या पत्नीला नाहक शिवीगाळ करत असल्यामुळे मुलगी मानसी मध्ये पडली. तिने वडिलांना समजावून शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रागाच्या भरात बेभान झालेल्या आरोपी शालिकरामने मानसीला मारहाण केली. एवढेच नव्हे, तर तिच्या पाठीवर चाकूने हल्ला चढवून तिला जबर जखमी केले.

आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली, त्यांनी आरोपीला आवरले. त्यानंतर जखमी मानसीवर उपचार करण्यात आले. दरम्यान, मिळालेल्या सूचनेनुसार कपिलनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मानसीची तक्रार नोंदवून आरोपी शालिकराम बावणे विरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर