शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दत्ताभाऊ म्हणजे दाताभाऊ, एका दातृत्वपर्वाची अखेर

By योगेश पांडे | Updated: March 23, 2026 04:43 IST

झालेत बहु, होतील बहु..पण यासम हाच....गरीब विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविणारे अनोखे शिक्षणमहर्षी

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : देशात आणि महाराष्ट्रात अनेक शिक्षणसम्राट झाले, अनेकांनी महाविद्यालयांची साखळी उभी केली, हजारो विद्यार्थी घडवले. पण समाजातील सर्वात शेवटच्या माणसापर्यंत शिक्षणाची ज्योत पोहोचवण्याचा ध्यास ज्यांनी घेतला, अशा मोजक्याच व्यक्तींमध्ये दत्ता मेघे यांचे नाव अग्रस्थानी राहील. विदर्भाला कर्मभूमी मानणारे दत्ता मेघे यांनी समाजातील सर्वच वर्गांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी झटत ते खऱ्या अर्थाने ‘दातृ’महर्षी होते हे दाखवून दिले. दत्ता मेघे यांच्याकडे कुणी अडचणीत गेला आणि तो रिकाम्या हाताने तेथून बाहेर पडला असे कधीच झाले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असोत, त्यांच्या अनेक शिक्षणसंस्थांतील शिक्षक-कर्मचारी असोत की अगदी कुठलीही ओळख नसताना त्यांच्या दातृत्वामुळे स्वत:च्या पायावर उभा असलेला गरीब घरातील आताचा सनदी अधिकारी असो, प्रत्येकाच्या मनात एक रूखरूख आणि झालेत बहु, होतील बहू...पण यासम हाच हीच भावना दिसून येत आहे.

गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर, संकटात सापडलेल्या कुटुंबांसाठी ते जणू देवदूतच ठरले. एखाद्याच्या मुलाचं शिक्षण थांबू नये म्हणून फी भरून देणे, रुग्णालयात उपचारासाठी पैसे देणे, शेतकऱ्यांना संकटात मदतीचा हात देणे, किंवा एखाद्या विधवेला संसार उभा करण्यासाठी आधार देणे, या सर्व गोष्टी त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होता. उजव्या हाताने दिलेलं डाव्या हाताला कळू नये या तत्वावर ते आयुष्य जगले. विदर्भाला कर्मभूमी मानून आयुष्यभर शिक्षण, सेवा आणि दातृत्वाचा दीप तेवत ठेवणारे दत्ताभाऊ आता आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने एका दातृत्वपर्वाचीच अखेर झाल्याची वेदना समाजाच्या प्रत्येक स्तरावरून व्यक्त होत आहे.

ना पक्ष, ना ओळख केवळ मानवतेचा चेहरा

दत्ता मेघे यांनी राजकारणाच्या चौकटीच्या बाहेर जात सर्वच पक्षाच्या लोकांना स्वत:हून मदत केली. त्यांच्याकडे दररोज सकाळपासूनच विविध अडचणी घेऊन लोक पोहोचायचे. त्यांना भेटण्यासाठी कधीही अपॉईंटमेंट वगैरेंची गरजच पडली नाही. अगदी फाटक्या कपड्यातील व्यक्तीदेखील तिसऱ्या मजल्यावरील त्यांच्या कार्यालयात थेट जाऊ शकत होता. कुठलाही पक्ष किंवा ओळख याची गरज लागत नव्हती. त्यांना केवळ मानवतेचाच चेहरा माहिती होता. अगदी साधारण कार्यकर्ता असताना ते महालातील एका पानठेल्यावर जायचे. अनेक वर्षांनी आठवण ठेवून त्यांनी त्याच्या मुलाला बोलावून एका महाविद्यालयात चांगली नोकरी लावून दिली. मुरलीधर डोईफोडे हे समाजवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या अपघात झाल्यानंतर त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत दत्ता मेघे यांनी हरतऱ्हेने त्यांची मदत केली. इतकेच नाही तर डोईफोडे यांच्या निधनानंतरदेखील त्यांच्या कुटुंबियांना मोठा आधार दिला. अशा अनेक कुटुंबांनी दत्ता मेघे यांच्या दातृत्वाचा अनुभव घेतला. आज ते नसले तरी त्यांच्या याच दातृत्वामुळे त्यांचे नाव जनसामान्यांच्या मनात अमर झाले आहे अशी भावना माजी उपमहापौर व दत्ता मेघे यांचे निकटवर्तीय रघुनाथ मालीकर यांनी व्यक्त केली.

१०० टक्के समाजकारणच

राजकारणापेक्षा १०० टक्के समाजकारण हाच दत्ता मेघे यांच्या कार्याचा मंत्र होता व तो त्यांनी आयुष्यभर जपला. एरवी तथाकथित शिक्षण सम्राटांकडून संस्थामध्ये नोकरीवर लावण्याचेदेखील कमिशन घेतले जाते. मात्र दत्ता मेघे एकीकडे अनेक गरीब मुलांना मोफत प्रवेश देत असतानाच दुसरीकडे अनेकांना चांगल्या नोकरीदेखील लावून दिल्या. मात्र त्यांनी कधीही कुणाकडून पाच पैसेदेखील घेतले नाही. तत्वांशी कधीही तडजोड करायची नाही हे ब्रीद त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपले.

दरवर्षी वाढदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन

दत्ता मेघे यांची नाळ जमिनीशीच जुळली होती. त्यांच्या प्रेरणेतून समीर व सागर मेघे यांनी साई अनाथाश्रम सुरू केला. दत्ता मेघे स्वत: रामभाऊ इंगोले यांच्या विमलाश्रमासोबत जुळले होते. दर वर्षी दत्ता मेघे यांच्या वाढदिवशी अनाथाश्रम व विमलाश्रमातील मुला-मुलींसोबतच पहिले सेलिब्रेशन व्हायचे. त्यांनी आयुष्यभर दिलं, तेही न बोलता, न मिरवता आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता. त्यांनी लावलेले दातृत्वाचे बीज आज अनेकांच्या मनात रुजले आहे. त्यांच्या प्रेरणेने अनेक तरुण सामाजिक कार्यात पुढे येत आहेत, हीच त्यांच्या कार्याची खरी पावती ठरेल, असे मालीकर यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Dattabhau: A Generous Legacy Ends, An Era of Philanthropy Concludes

Web Summary : Datta Meghe, a true philanthropist, dedicated his life to education and helping the underprivileged. He aided countless individuals, providing education, healthcare, and support without seeking recognition. His selfless service and commitment to humanity have left an enduring legacy in Vidarbha and beyond.
टॅग्स :Datta Megheदत्ता मेघे