प्रेग-काेविड रजिस्ट्रीमध्ये गर्भवतींच्या आराेग्याचा डेटाबँक ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:11 IST2021-08-21T04:11:34+5:302021-08-21T04:11:34+5:30
गर्भवती महिलांवर व त्यांच्या गर्भावर लसीकरणामुळे काय परिणाम होतात, याविषयी डेटा उपलब्ध नसल्याने त्यांचे लसीकरण थांबले होते. प्रेग-कोविड रजिस्ट्रीच्या ...

प्रेग-काेविड रजिस्ट्रीमध्ये गर्भवतींच्या आराेग्याचा डेटाबँक ...
गर्भवती महिलांवर व त्यांच्या गर्भावर लसीकरणामुळे काय परिणाम होतात, याविषयी डेटा उपलब्ध नसल्याने त्यांचे लसीकरण थांबले होते. प्रेग-कोविड रजिस्ट्रीच्या टीमच्या अभ्यासानंतर आयसीएमआरच्या सूचनेनुसार देशात गर्भवतींचे लसीकरण सुरू झाले. त्यानुसार ३० जुलै २०२१ पर्यंत देशात २.२७ लाख गर्भवती महिलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. यामध्ये तामिळनाडूत सर्वाधिक ७८,८३८ व त्यापाठोपाठ आंध्रप्रदेश ३४,२२८, ओडिशा २९,८२१, मध्यप्रदेश २१,८४२, केरळ १८,४२३ तर कर्नाटकमध्ये १६,६७३ महिलांना लसीचा पहिला डोस दिला. सध्या प्रमाण कमी असले तरी प्राथमिक आरोग्य स्तरावर समुपदेशन करून प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे डॉ. गजभिये यांनी सांगितले.
नागपूरकर राहुल गजभिये यांचे याेगदान
या प्रत्येक संशाेधनात डाॅ. राहुल गजभिये यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पवनी, जि. भंडारा येथे जन्मलेले डाॅ. गजभिये यांनी अमरावतीवरून एमबीबीएस व पुण्याहून एमडी पूर्ण केले. ग्रामीण भागात सेवा देताना वैद्यकीय संशाेधनाकडे त्यांचा कल झुकला व २००३ साली एनआयआरआरएचमध्ये संशाेधक म्हणून रुजू झाले. काेराेना काळातील संशाेधनासह अनेक वैद्यकीय संशाेधनामध्ये त्यांचे याेगदान उल्लेखनीय ठरले आहे. त्यांना अमेरिका व ऑस्ट्रेलियाची फेलाेशिप प्राप्त असून डीबीटी वेलकम ट्रस्टची ग्रॅन्ट मिळविणारे ते एनआयआरआरएचचे पहिले संशाेधक आहेत.