गर्द विक्रेत्या शहनाजला तीन महिने कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:11 IST2021-08-25T04:11:58+5:302021-08-25T04:11:58+5:30

नागपूर : सत्र न्यायालयाने गर्द विक्रेत्या शहनाज बेगम अजिज खान (३७) हिला ३ महिने सश्रम कारावास व पाच हजार ...

Dark seller Shahnaz jailed for three months | गर्द विक्रेत्या शहनाजला तीन महिने कारावास

गर्द विक्रेत्या शहनाजला तीन महिने कारावास

नागपूर : सत्र न्यायालयाने गर्द विक्रेत्या शहनाज बेगम अजिज खान (३७) हिला ३ महिने सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्या. एस. ए. एस. एम. अली यांनी हा निर्णय दिला.

शहनाज ताजनगर, टेका येथील रहिवासी आहे. ३ जून २०१५ रोजी गुन्हे शाखा पोलिसांना शहनाजने तिच्या घरी गर्दचा साठा ठेवला असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिसांच्या पथकाने शहनाजच्या घरी छापा मारून तपासणी केली असता ५१ हजार रुपये किमतीचे ५१ ग्रॅम गर्द पावडर आढळून आले. त्यानंतर शहनाजविरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. न्यायालयात सरकारच्यावतीने ॲड. पंकज तपासे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Dark seller Shahnaz jailed for three months