शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दपूम रेल्वेने १२०६ कोचमध्ये लावले ४२९९ बायो टॉयलेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 21:56 IST

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने १२०६ कोचमध्ये ४२९९ बायो टॉयलेट लावून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

ठळक मुद्देपर्यावरण रक्षणासाठी पुढाकार : बायो टॉयलेटमध्ये कचरा न टाकण्याचे आवाहन

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : स्वच्छता अभियानांतर्गत रेल्वेगाड्या आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असताना भारतीय रेल्वेने बायो टॉयलेट विकसित केले. हे बायो टॉयलेट पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकुल असून यात मानवी मल ६ ते ८ तासात गॅस आणि पाण्यात रुपांतरीत होतो. यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने १२०६ कोचमध्ये ४२९९ बायो टॉयलेट लावून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.बायो टॉयलेटमध्ये मानवी मल थेट टँकमध्ये जाऊन त्याचे पाणी आणि गॅसमध्ये रुपांतर होते. यामुळे रेल्वेस्थानक आणि रेल्वे रुळाच्या आजूबाजूला स्वच्छता राखण्यास मदत होते. बायो टॉयलेटमुळे रेल्वे रुळांचे आयुष्य वाढण्यास मदत होते. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने ३० सप्टेबर २०१९ पर्यंत सर्व कोचमध्ये बायो टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सर्व जुन्या १२०६ कोचमध्ये यशस्वीरीत्या ४२९९ बायो टॉयलेट लावण्यात आले आहेत. बायो टॉयलेट टँक स्टीलची बनविलेली असते. त्याची लांबी ११५० मिलिमिटर, रुंदी ७२० मिलीमिटर आणि उंची ५४० मिलीमिटर असते. या टँकचे वजन १६८ किलोग्रॅमआणि भरलेल्या स्थितीत ४२५ किलोग्रॅम असते. एक टँक तयार करण्यासाठी ७५ हजार रुपये खर्च येतो. बायो टॉयलेटमध्ये प्रवाशांनी कचरा, चहाचे कप, पाण्याच्या बॉटल, गुटख्याची पाकिटे, प्लास्टिक टाकल्यास ते नादुरुस्त होते. त्यामुळे प्रवाशांनी बाय टॉयलेटमध्ये कुठल्याही वस्तू न टाकून पर्यावरण रक्षणाच्या कार्यात हातभार लावावा, असे आवाहन दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेenvironmentपर्यावरण