दपूम रेल्वे महाव्यवस्थापकांनी घेतला इतवारी रेल्वे स्टेशनचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:11 AM2021-09-15T04:11:33+5:302021-09-15T04:11:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच मंगळवारी नागपूर मंडळाचा ...

Dapoom Railway General Manager reviews Itwari Railway Station | दपूम रेल्वे महाव्यवस्थापकांनी घेतला इतवारी रेल्वे स्टेशनचा आढावा

दपूम रेल्वे महाव्यवस्थापकांनी घेतला इतवारी रेल्वे स्टेशनचा आढावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच मंगळवारी नागपूर मंडळाचा दौरा केला. यावेळी त्यांनी इतवारी रेल्वे स्टेशनचा आढावा घेत स्टेशनवर उपलब्ध असलेल्या प्रवासी सुविधा, एफओबी, गार्ड लॉबी, वेटिंग हॉल, विश्राम गृह, बुकिंग ऑफिस, पार्सल ऑफिस आदींचे निरीक्षण केले.

या दौऱ्यात त्यांनी इतवारी रेल्वे स्टेशनच्या दक्षिण दिशेला सुरू असलेले सर्व प्रस्तावित विकास कामे व प्रवाशांच्या सुविधांचाही आढावा घेतला. इतवारी स्टेशनला कोचिंग टर्मिनलच्या स्वरूपात विकसित केले जात आहे. इतवारी-नागभीड आमान परिवर्तन तसेच तिसऱ्या लाईनचे कार्य पूर्ण झाल्यास भविष्यात जास्तीत जास्त गाड्यांचे परिचालन इतवारी येथून प्रस्तावित आहे. यानंतर महाव्यवस्थापकांनी मंडळ रेले व्यवस्थापक कार्यालयाच्या सभा कक्षात समीक्षा बैठक घेतली. मंडळ रेल व्यवस्थापक मनिंदर उप्पल यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून नागपूर मंडळाच्या महत्त्वाचे कार्य व मंडळाच्या उपलब्धींसंदर्भात माहिती दिली. सोबतच विविध विकास कार्यांचे ॲक्शन प्लॅनविषयी माहिती दिली. याप्रसंगी आलोक कुमार यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधला. आलोक कुमार यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांशी संवाद साधत एचआरएमएस सुविधेसंदर्भाचे फायदे व उपयुक्ततेविषयी जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी बेलिशॉप, मोतीबाग कॉलनीमध्ये २४ बेडची क्षमता असलेल्या ४५७ वर्गमीटरमध्ये नवनिर्मित महिला आरपीएफ बॅरकचे उद्घाटन केले व पंजाबी लाईन मोतीबाग येथील कोविड हॉस्पिटलचा आढावा घेतला.

---------------

तीन वर्ष लोटले तरी प्लॅटफॉमर्च काम अपूर्ण

इतवारी स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६चे काम गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये अरुंद असलेल्या या प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, तीन-चार महिन्यात व्हावयाचे हे काम अजूनही अपूर्ण आहे. या कामाची फाईल दीर्घ काळ दपूम रेल्वे मुख्यालयात पडून होती. मंजुरी मिळाल्यानंतर या कामासाठी दोन कोटी रुपये जाहीर झाले होते. आलोक कुमार यांनी मंगळवारी इतवारी रेल्वे स्टेशनचा आढावा घेतला. मात्र, या कामासंदर्भात अधिकाऱ्यांना कोणतेच आदेश दिले नाही, हे विशेष.

...................

Web Title: Dapoom Railway General Manager reviews Itwari Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app