शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

हृदय रोगावर स्वत:हून औषधी घेणे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:44 IST

हृदय रोगावर स्वत:हून औषधी घेणे हे दुसऱ्या आजाराला आमंत्रण देणारे आहे. अनेकदा काही रुग्ण जराही छातीत दुखू लागले, की ‘अ‍ॅस्प्रीन’ नावाची गोळी घेतात. मुळात ही गोळी रक्त पातळ करते. त्यामुळे अवयवांमध्ये, मेंदूत अतिरिक्त रक्तस्राव होण्याची जोखीम बळावते. यामुळे अशा कुठल्याही गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे धोकादायक आहे, अशी माहिती हृदयरोग तज्ज्ञ डॉ. पंकज मनोरिया यांनी दिली.

ठळक मुद्दे‘बेस्ट ऑफ कार्डिओलॉजी’ परिषदेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हृदय रोगावर स्वत:हून औषधी घेणे हे दुसऱ्या आजाराला आमंत्रण देणारे आहे. अनेकदा काही रुग्ण जराही छातीत दुखू लागले, की ‘अ‍ॅस्प्रीन’ नावाची गोळी घेतात. मुळात ही गोळी रक्त पातळ करते. त्यामुळे अवयवांमध्ये, मेंदूत अतिरिक्त रक्तस्राव होण्याची जोखीम बळावते. यामुळे अशा कुठल्याही गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे धोकादायक आहे, अशी माहिती हृदयरोग तज्ज्ञ डॉ. पंकज मनोरिया यांनी दिली.कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, विदर्भ शाखेतर्फे ‘बेस्ट ऑफ कार्डिओलॉजी’ या दोन दिवसीय वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी होण्यासाठी डॉ. मनोरिया आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, विदर्भ शाखेचे अध्यक्ष डॉ. अनुज सारडा, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अजीज खान, डॉ. सजपाल अर्नेजा, डॉ. मुकुंद देशपांडे, डॉ. प्रदीप देशमुख, डॉ. विकास बिसेन, डॉ. राम घोडेस्वार व डॉ. पंकज हरकुट आदी उपस्थित होते.डॉ. मनोरिया म्हणाले, कुटुंबातील कुणा सदस्याला उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा उच्च कोलेस्ट्रॉल असेल तर लहानपणापासूनच नियमित तपासणी करायला हवी. कौटुंबिक इतिहास आणि व्यक्तीच्या जीवनशैलीच्या आधारावर वर्षातून एकदा तपासणी व्हायला हवी. या सर्व आजारांवर नियमित औषधी घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. डॉ. अजीज खान, म्हणाले, हृदय रोगाच्या रुग्णामधील दर दहा व्यक्तीपैकी चार जण वयाच्या चाळिशीतील असतात. माणसाचे सरासरी वयोमान वाढले असले तरी आजारांचे वय कमी कमी होत आहे.या दोन दिवसीय वार्षिक परिषदेत डॉ. सुरेंद्र देवरा, डॉ. प्रशांत अडवाणी, डॉ. चरण लांजेवार, डॉ. नितीन देशपांडे, डॉ. आशिष नाबर, डॉ. प्रशांत जोशी, डॉ. पंकज राऊत, डॉ. निधीश मिश्रा, डॉ. जोनन क्रिस्टोफर, डॉ. बी. के. शास्त्री, डॉ. सजपाल अर्नेजा, डॉ. श्रीरंग गोडबोले, डॉ. माणिक चोप्रा, डॉ. महेश फुलवानी, डॉ. नागेश्वर वाघमारे, डॉ. हर्ष मेहता, डॉ. शंकर खोब्रागडे, डॉ. शंतनु देशपांडे, डॉ. पवन अग्रवाल व अन्य तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. परिषदेत अध्यक्षीय स्वागतपर भाषण डॉ. अनुज सारडा यांनी केले तर आभार सहसचिव डॉ. अच्युत खांडेकर यांनी मानले. परिषदेत ३०० हून अधिक हृदयरोग चिकित्सक सहभागी झाले होते.

 

 

टॅग्स :Heart Diseaseहृदयरोगdoctorडॉक्टर