अनलॉकच्या पहिल्याच दिवशी धोक्याची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:10 IST2021-06-09T04:10:20+5:302021-06-09T04:10:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत निर्बंधांमध्ये सूट दिली आहे. नागपूरसह विदर्भातील अनेक भाग सोमवारपासून ...

Dangerous crowd on the first day of unlock | अनलॉकच्या पहिल्याच दिवशी धोक्याची गर्दी

अनलॉकच्या पहिल्याच दिवशी धोक्याची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत निर्बंधांमध्ये सूट दिली आहे. नागपूरसह विदर्भातील अनेक भाग सोमवारपासून अनलॉक झाले. मात्र बऱ्याच ठिकाणी नागरिकांनी संयम पाळला नाही व बाजारपेठांमध्ये अनावश्यक गर्दी दिसून आली. बाजारातील ही अनियंत्रित गर्दी पाहता नागपुरात कोरोना नियंत्रणात येईल की पुन्हा संक्रमण वाढेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारने जारी केलेल्या यादीनुसार नागपूर, भंडारा, अमरावती, वर्धा येथे काही निर्बंधांसह तर गोंदिया व यवतमाळ येथे पूर्णत: अनलॉकसह व्यवहार सुरू झाले. नागपुरात सायंकाळी ५ वाजेपर्यंतच दुकाने व व्यापार सुरू ठेवण्याची परवानगी दिली.

सोमवारी सर्व बाजार सुरू झाला व ज्याची भीती होती तेच घडले. पहिल्याच दिवशी नागरिकांनी बाजारात प्रचंड गर्दी केली. नागपुरातील सीताबर्डी, महाल, सदर, धरमपेठ, गांधीबाग यासारख्या मुख्य बाजारपेठेत प्रचंड गर्दी होती. सुरक्षित अंतराच्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली झाली. विदर्भातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी कोरोनाचा विषाणू मात्र अजूनही पूर्णपणे गेलेला नाही, ही बाब नागरिकांनी समजून घ्यावी. त्यामुळे स्वत:ला आवर घालावा. अन्यथा बाजारातील ही गर्दी पुन्हा एकदा नागपुरात काेरोनाचा संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाजारात उत्साह; दुकानदार-व्यापारी आनंदी

सोमवारी विदर्भातील सर्वच शहरांमधील बाजारात प्रचंड उत्साह दिसून आला. निर्बंध कायम असले तरी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार असल्याने दुकानदार-व्यापारी आनंदात होते. विशेषत: जिम, सलून, पार्लरचालक, चहा पानटपऱ्या चालविणारे छोटे व्यावसायिक आदींच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. लहानांपासून तर मोठ्या दुकानांपर्यंत सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करीत दुकानांमध्ये सॅनिटायझरची व्यवस्था ठेवली होती. दुकानदार नागरिकांना संयम पाळण्याचे आवाहन करत होते.

Web Title: Dangerous crowd on the first day of unlock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.