शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

खतरनाक गुन्हेगाराचा तीन कैद्यांवर खुनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:06 IST

एकाची प्रकृती गंभीर : मध्यवर्ती कारागृहातील घटनेने खळबळ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरात सर्वांत मोठे हत्याकांड घडवून ...

एकाची प्रकृती गंभीर : मध्यवर्ती कारागृहातील घटनेने खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरात सर्वांत मोठे हत्याकांड घडवून आणणारा गुन्हेगार विवेक गुलाबराव पालटकर याने कारागृहातील तिघांवर खुनी हल्ला चढविला. यात जखमी झालेल्या एकाची प्रकृती गंभीर असून दोघे जखमी झाले आहेत. ते दोघेही धोक्याबाहेर आहेत. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे कारागृहात प्रचंड खळबळ उडाली होती. विवेक पालटकर याने जून २०१८ मध्ये नागपूर हादरविणारे थरारक हत्याकांड घडवून आणले होते. आराधना नगरात राहणारी त्याची सख्खी बहीण, जावई आणि तिची मुले अशा पाचजणांची पालटकरने निर्घृण हत्या केली होती. यानंतर तो पंजाबमध्ये पळून गेला होता. सध्या उत्तराखंडमध्ये उपमहानिरीक्षक असलेले आणि तेव्हा नागपुरात परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त म्हणून कर्तव्यावर असलेले डॉ. निलेश भरणे यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी पालटकर याला पंजाबमधून अटक करून नागपुरात आणले होते. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला कारागृहात डांबण्यात आले. तेव्हापासून तो येथील मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. त्याला बडी गोल बराक क्रमांक सातमध्ये ठेवण्यात आले होते.

थंड डोक्याचा गुन्हेगार असलेल्या पालटकरच्या कुरबुरी तेथेही सुरू होत्या. मात्र कारागृह अधिकाऱ्यांच्या कानापर्यंत त्या पोहोचत नसल्याने त्याच्यावर कारवाई झाली नव्हती. शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास कारागृह बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली. कारागृहातील अधिकारी आणि रक्षक प्रत्येक बराकीत पाहणी करीत असताना बडी गोल बराक क्रमांक सातमध्ये आरोपी पालटकर राजू मोहनलाल वर्मा नामक हत्येच्या आरोपातील गुन्हेगारावर हल्ला करताना दिसला. त्याच्या हातातील कपड्यांंत त्याने दगड बांधून ठेवले होते. या दगडाचे फटके तो वर्मा याच्या डोक्यावर मारत असल्याने वर्मा रक्ताने न्हाऊन निघाला होता. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात पुढे आलेल्या अन्य दोन कैद्यांवरही आरोपी पालटकरने असाच हल्ला चढवला. त्यामुळे गणेश ठाकूर आणि आत्माराम राय नामक कैदी गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे कारागृहात प्रचंड खळबळ उडाली. कारागृह अधिकारी आणि रक्षकांनी लगेच आरोपी पालटकरला ताब्यात घेतले. गंभीर जखमी झालेल्या वर्मा याला तातडीने ॲम्बुलन्समध्ये घालून मेडिकलला नेण्यात आले. अन्य दोन जखमीवर कारागृहातील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले.

----

अंडासेलमध्ये डांबले

या घटनेमुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ निर्माण झाली. घटनेनंतर कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांच्या आदेशावरून आरोपी पालटकर याला अंडासेलमध्ये डांबण्यात आले.

---

धंतोलीत गुन्हा दाखल

कारागृह प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी आरोपी पालटकरविरुद्ध गुन्हा दाखल केला. जखमी वर्मा याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

---