घातपात करवून घेतला जाऊ शकतो
By Admin | Updated: August 27, 2016 02:13 IST2016-08-27T02:13:29+5:302016-08-27T02:13:29+5:30
दहशतवादी संघटना आणि देशविघातक शक्ती वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधून, वेगवेगळे कारस्थान करून हल्ले करतात.

घातपात करवून घेतला जाऊ शकतो
संघ मुख्यालयाजवळ मनोरुग्णाचा हैदोस
नागपूर : दहशतवादी संघटना आणि देशविघातक शक्ती वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधून, वेगवेगळे कारस्थान करून हल्ले करतात. दहशतवाद्यांची रक्तपात घडवून आणण्याची वेगवेगळी पद्धत ठिकठिकाणच्या हल्ल्यातून, रक्तपातातून पुढे आली आहे.
अशाच प्रकारे कुण्या व्यक्तीचे डोके फिरवून त्याला काही दिवसांसाठी मनोरुग्णासारखे चाळे करायला लावून संवेदनशील स्थळाच्या आजूबाजूला ठेवले जाऊ शकते. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांच्या गाफिलपणाचा फायदा घेत त्याच्याकडून घातपात करवून घेतला जाऊ शकतो. दहशतवादी हल्लाही घडवून आणला जाऊ शकतो.
तशी शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया या प्रकरणाच्या निमित्ताने अनेक सुजाण नागरिकांनी नोंदवली आहे. सुरक्षा यंत्रणांनी यातून धडा घेण्याची गरजही अनेकांनी विशद केली आहे. (प्रतिनिधी)