शहरं
Join us  
Trending Stories
1
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
2
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
3
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
4
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
5
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
6
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
7
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
8
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
9
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
10
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
11
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
12
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
13
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
14
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
15
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
17
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
18
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
19
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
20
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली

प्रखर प्रकाशामुळे नागपुरात विमान अपघाताचा धोका; विमानतळ परिसरात ‘बिम लाइट’वर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 10:20 PM

Nagpur News कार्यक्रमांच्या निमित्ताने आकाशाच्या दिशेने केल्या जाणाऱ्या तीव्र क्षमतेच्या प्रखर प्रकाशझोतामुळे नागपुरात विमान अपघात होऊ शकतो. होय, हा धोका अनेक वैमानिकांनी विमानतळ प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या लक्षात आणून दिला आहे.

ठळक मुद्देपोलिसांकडून मनाई आदेश जारीवैमानिकांकडून लक्ष्यवेध

नागपूर : कार्यक्रमांच्या निमित्ताने आकाशाच्या दिशेने केल्या जाणाऱ्या तीव्र क्षमतेच्या प्रखर प्रकाशझोतामुळे नागपुरात विमान अपघात होऊ शकतो. होय, हा धोका अनेक वैमानिकांनी विमानतळ प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या लक्षात आणून दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात ‘बिम लाइट’वर बंदी घातली आहे.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिवसरात्र वेगवेगळ्या एअरलाइन्स तसेच भारतीय वायुसेनेची विमाने आणि हेलिकॉप्टर उतरतात तसेच उडतात. रात्रीच्या वेळी वैमानिकांना दिशा आणि धावपट्टी दाखवण्यासाठी रन-वे तसेच एटीसी टॉवरकडून संकेतासाठी विशिष्ट लाइट्सचा वापर करण्यात येतो. दरम्यान, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने अनेक आयोजक आकाशाच्या दिशेने बिम लाइट (प्रखर प्रकाशझोत)चा वापर करतात. बिम लाइटमुळे अनेकदा वैमानिकांचे डोळे दीपून दुर्घटना होण्याची शक्यता असते. नागपूर विमानतळ परिसरात आणि आजूबाजूच्या भागात अनेक वैमानिकांना बिम लाइटचा नकारात्मक अनुभव आला आहे. त्यांनी तो स्थानिक विमानतळ प्रशासनाच्या लक्षात आणून दिला आहे. विमानतळ प्रशासनाने पोलीस अधिकाऱ्यांकडे हा प्रकार अलीकडे कथन करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे यांनी सोमवारी एक अधिसूचना जारी केली आहे. नागपूर विमानतळ आणि आजूबाजूच्या १५ किलोमीटर परिसरात सायंकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत प्रखर (बिम) लाइट आकाशाच्या दिशेने सोडू नये, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

कडक कारवाईचा इशारा

२० जानेवारीपासून पुढच्या दोन महिन्यांपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजक अथवा व्यक्तीने आदेशाचे उल्लंघन केल्यास भादंविच्या कलम १८८ अन्वये संबंधितावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

-----

टॅग्स :AccidentअपघातAirportविमानतळ