शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

धोका कोरोनाचा : आजपासून ड्रोन ठेवणार संवेदनशील वस्त्यांवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 00:41 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या संदर्भात ज्या भागात अद्यापही पाहिजे तसे जनजागरण झाले नाही त्या भागात पोलीस आता ड्रोनच्या माध्यमातून जनजागरण करणार आहेत.

ठळक मुद्देड्रोनच्या माध्यमातून जनजागरणही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या संदर्भात ज्या भागात अद्यापही पाहिजे तसे जनजागरण झाले नाही त्या भागात पोलीस आता ड्रोनच्या माध्यमातून जनजागरण करणार आहेत. आज पोलिसांनी या संबंधाने एका अत्याधुनिक ड्रोनची ट्रायल घेतली. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे संबंधित भागात पोलीस ड्रोन फिरवू शकले नाही. त्यामुळे शनिवारी तंत्रज्ञांची मदत घेऊन आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. त्यानंतर हा ड्रोन संबंधित भागात जनजागरणासाठी फिरविला जाणार आहे.कोरोनाचा धोका समजून सांगण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ते सर्व उपक्रम हाती घेतले आहे. पोलिसांची गस्ती वाहने प्रत्येक भागात सकाळपासून रात्रीपर्यंत फिरून जनजागरण करीत आहेत. काही भागात पोलिसांनी सामाजिक संस्था, संघटनाच्या आणि सेवाभावी नागरिकांच्या मदतीने ऑटो लावूनही जनजागरण सुरू केले आहे. हजारावर कोविड योद्धेही सक्रिय करण्यात आले आहेत. मात्र शहरात अनेक असे भाग आहे ज्या भागात दाटीवाटीने घरे उभी आहेत. त्यामुळे त्या भागात पोलिसांची वाहने जात नाहीत. मोठी वाहनेच काय साधे ऑटोही त्या भागात जात नाही. त्यामुळे अशा भागात पाहिजे त्या प्रमाणात पोलिसांकडून जनजागरण होऊ शकलेले नाही. ही बाब ध्यानात घेऊन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आता जनजागरणासाठी ड्रोनची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पोलीस लाईन टाकळी परिसरात आज ट्रायल म्हणून एक ड्रोन उडविण्यात आला. मात्र त्याला संलग्न करण्यात येणारे स्पीकर आणि इतर यंत्रणा कार्यान्वित झाली नाही. त्यामुळे आजचा प्रयोग सायंकाळी थांबविण्यात आला. शनिवारी तंत्रज्ञानांची मदत घेऊन ड्रोनला पॉवरफूल स्पीकर तसेच अन्य अत्याधुनिक उपकरणे जोडली जातील. त्यानंतर हा ड्रोन मोमीनपुरा, सतरंजीपुरा, भालदारपुरा आणि अशाच अन्य गर्दीच्या, दाटीवाटीच्या भागात फिरवला जाणार आहे. या ड्रोनला जोडण्यात आलेल्या स्पीकरमधून कोरोनाच्या प्रादुर्भावाचे धोके नागरिकांना समजावून सांगन्यात येईल. घरातच रहा, अशा सूचना देण्यासोबतच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबतही आवाहन केले जाईल. शनिवारपासून ड्रोन कार्यान्वित केला जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांनी लोकमत'ला दिली.दुहेरी उद्देश !राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा अशाच मोठ्या नेत्यांच्या सभा, रॅली किंवा जेथे प्रचंड प्रमाणात गर्दी झाली आहे, अशा ठिकाणी बंदोबस्ताचा, खबरदारीचा उपाय म्हणून ड्रोनचा वापर केला जातो. मात्र कोरोनाने सर्वत्र थैमान घालून प्रचंड दहशत निर्माण केली आहे. प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. तो रोखण्यासाठी नागपूरसह देशातील अनेक शहरात ड्रोनचा वापर केला जात आहे.ड्रोन उडविण्याचा आमचाही दुहेरी उद्देश असल्याचे डॉ. भरणे यांनी सांगितले. ड्रोनच्या माध्यमातून एकीकडे आम्ही जनजागरण करू, दुसरीकडे त्या भागात गर्दी तर होत नाही ना आणि व्यवस्थित सोशल डिस्टनसिंग पाळले जात आहे की नाही, त्याचीही आम्ही क्षणाक्षणाला माहिती मिळवत राहू. स्मार्ट कंट्रोल रूममध्ये बसलेले तंत्रज्ञ या ड्रोन ला नियंत्रित करतील आणि त्याच्या इमेजवर लक्ष ठेवतील. विशेष उल्लेखनीय असे की, नागपुरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर पोलीस ड्रोनचा वापर करणार असल्याची बातमी लोकमत'ने काही दिवसांपूर्वी दिली होती, त्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.