शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मध्येच बोलले...
2
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
3
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
4
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
5
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
6
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
7
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
8
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
9
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
10
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
11
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
12
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
13
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
14
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
15
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
16
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार
17
खळबळजनक! T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, वेगवेगळ्या नंबरवरून आले फोन
18
ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री
19
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
20
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी

विकास महात्मे करताहेत धनगर समाजाची दिशाभूल ; विक्रम ढोणे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 8:05 PM

भाजपचे खा. डॉ. विकास महात्मे हे धनगर समाजाला एसटीचे सर्टिफिकेट मिळवून देणार होते. परंतु त्यांनी स्वत:साठी खासदारकी मिळवली. ते सुरुवातीपासूनच धनगर समाजाची दिशाभूल करीत असून त्यांचा हा कार्यक्रम आजही धूमधडाक्यात सुरू आहे, अशी टीका धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेद्वारे केली.

ठळक मुद्देधनगर विवेक जागृती अभियानद्वारे प्रबोधन करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपचे खा. डॉ. विकास महात्मे हे धनगर समाजाला एसटीचे सर्टिफिकेट मिळवून देणार होते. परंतु त्यांनी स्वत:साठी खासदारकी मिळवली. ते सुरुवातीपासूनच धनगर समाजाची दिशाभूल करीत असून त्यांचा हा कार्यक्रम आजही धूमधडाक्यात सुरू आहे, अशी टीका धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेद्वारे केली.ढोणे म्हणाले, धनगरांच्या एसटी आरक्षणाची मागणी जुनी आहे. १९७९ ला महाराष्ट्र सरकारने हे आरक्षण देण्यासंबंधी केंद्र सरकारला शिफारस केली होती. मात्र निकष पूर्ण होत नसल्याने ती १९८१ ला परत घेण्यात आली. त्यानंतर अनेकांनी प्रयत्न केले. परंतु कुणीही हा विषय सोडवू शकले नाही. राजकीय मंडळींकडून सातत्याने ‘व्होटबँक पॉलिटिक्स’साठी या विषयाचा वापर करण्यात आला. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपने हा खेळ अतिशय नियोजनपूर्वक खेळला. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने डॉ. विकास महात्मे यांना ‘मोहरा’ बनवून समाजात सोडले. सर्व ताकद वापरून त्यांचे नेतृत्व प्रस्थापित केले. मतांचे राजकारण साध्य झाल्यावर त्यांना योग्यवेळी पक्षात घेऊन खासदारकीची बिदागी दिली. खा. महात्मे यांनी नुकतीच राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यावेळी धनगर हे एसटीत आधीपासूनच आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे राज्यघटनेचा अवमान होत आहे. आपण स्वत: लक्ष घालून ही अंमलबजावणी करावी’अशी मागणी केली. परंतु हीच मागणी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून करतील का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.खा. महात्मे यांच्या धनगर समाज संघर्ष समितीने ४ जानेवारी २०१५ रोजी मेळावा घेतला होता. त्याला चार वर्षे पूर्ण होत आहे. याच मेळाव्यात धनगर आरक्षणाबरोबर डॉ. महात्मे यांना राज्यसभा खासदार करा, अशी मागणी करण्यात आली होती. ती मागणी दीड वर्षात पूर्ण झाली. ३१ मे २०१६ ला डॉ. महात्मे खासदार झाले. ते संसदेत गेल्यावर एकदोनदा प्रश्न मांडण्याशिवाय काही करू शकले नाही. डॉ. महात्मे यांच्या खासदारकीमुळे आरक्षणाचा विषय कणभरही पुढे गेलेला नाही. त्यांनी समाजाला अंधारात ठेवून खासदारकी मिळवली, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.धनगर विवेक जागृती अभियानाद्वारे आरक्षणाबद्दल सुरू असलेल्या या धुळफेकीबाबत समाजात जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणVikas Mahatmeविकास महात्मे