शेतातील साैरऊर्जा संयंत्राचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST2021-06-28T04:07:27+5:302021-06-28T04:07:27+5:30

रेवराल : शेतात लावलेल्यश साैरऊर्जा संयंत्राच्या प्लेट फाेडल्याची घटना अराेली (ता. माैदा) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील देवमुंढारी शिवारात शुक्रवारी (दि. ...

Damage to farm power plants | शेतातील साैरऊर्जा संयंत्राचे नुकसान

शेतातील साैरऊर्जा संयंत्राचे नुकसान

रेवराल : शेतात लावलेल्यश साैरऊर्जा संयंत्राच्या प्लेट फाेडल्याची घटना अराेली (ता. माैदा) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील देवमुंढारी शिवारात शुक्रवारी (दि. २५) मध्यरात्री घडली असून, शनिवारी (दि. २६) सकाळी उघडकीस आली.

विशाल गजानन भर्रे, रा. देवमुंढरी, ता. माैदा यांची देवमुंढरी शिवारात शेती आहे. त्यांनी त्यांच्या शेतात जून २०१९ मध्ये साैरऊर्जा संयंत्र लावले आहेत. ते शुक्रवारी सायंकाळी शेतातील घरी परत आले असता, या संयंत्राच्या सर्व प्लेट शाबूत हाेत्या. मात्र, शनिवारी सकाळी यातील १९ प्लेटपैकी नऊ प्लेट दगडाने फाेडण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या प्रकाराची माहिती तलाठ्याला दिली. तलाठ्याने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी सागर भर्रे, गणेश भर्रे उपस्थित हाेते.

===Photopath===

270621\1725-img-20210627-wa0013.jpg

===Caption===

शेतावरील मुद्रा सोलर फोडले फोटो

Web Title: Damage to farm power plants