शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपूर विभागातील धरणे ‘फुल्ल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 22:18 IST

मुसळधार पावसामुळे नागपूरसह एकूणच विभागातील पाणीटंचाई दूर झाली आहे. नागपूर विभागातील धरणांमध्ये पाणीच पाणी आहे. विभागातील एकूण १८ धरणांपैकी ५ धरणे १०० टक्के तर ५ धरणे ९० टक्केवर भरली आहेत.

ठळक मुद्दे५ धरणे १०० टक्के, ५ धरणे ९० टक्केवर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरसह एकूणच विभागातील पाणीटंचाई दूर झाली आहे. नागपूर विभागातील धरणांमध्येपाणीच पाणी आहे. विभागातील एकूण १८ धरणांपैकी ५ धरणे १०० टक्के तर ५ धरणे ९० टक्केवर भरली आहेत.नागपूर विभागात एकूण मोठी धरणे १८ आहेत. यापैकी गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा, गडचिरोलीतील दिना, आणि वर्धा जिल्ह्यातील धाम व पोथरा ही धरणे १०० टक्के भरली आहेत. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह ९६.१६ टक्के, कामठी खैरी ९४.११ टक्के, वडगाव ९१.४४ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला ९३.०६ टक्के, कालिसरार ९४.८४ टक्के भरली आहेत. यासोबतच लोअर नांद ८५.५६ टक्के, सिरपूर ८५.२१ टक्के, लोअर वर्धा ८२.६६ टक्के इतकी भरली आहेत. उर्वरित धरणांमध्ये रामटेक २९.२३ टक्के, बोर ५६.८४ टक्के, गोसेखुर्द ५०.८७ टक्के, बावनथडी ३४.७१ आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २- ३०.४९ टक्के इतके भरले आहे.पाच वर्षातील सर्वाधिक साठानागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास मागील पाच वर्षात यंदा धरणांमध्ये सर्वाधिक पाणीसाठा जमा झाला आहे. विभागातील १८ मोठ्या धरणातील पाणीसाठा क्षमता ३५५२.२६ दलघमी इतकी आहे. आजच्या तारखेला १३ सप्टेंबर रोजी या धरणांमध्ये एकूण २७५८.२४ दलघमी म्हणजेच ७७.६५ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या पाच वर्षातील आजच्याच दिवसातील पाणीसाठ्याचा विचार केल्यास तो कितीतरी अधिक अआहे. उदाहरणार्थ गेल्या वर्षी आजच्या तारखेला केवळ १६४८.०८ दलघमी म्हणजेच ४६.३८ टक्के इतका साठा होता. त्यापूर्वी २०१७ मध्ये ११६५.३५ दलघमी, २०१६ मध्ये २००९.०४ दलघमी, २०१५ मध्ये २३५५.६९ दलघमी आणि २०१४ मध्ये २५४९.१३ दलघमी इतका होता.

टॅग्स :DamधरणWaterपाणी